Tuesday, March 25, 2025
Homeनगरडॉ. पंकज आशिया नगरचे नवे जिल्हाधिकारी

डॉ. पंकज आशिया नगरचे नवे जिल्हाधिकारी

यवतमाळहून नगरला झाली बदली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांच्या साखर आयुक्तीपदी झालेल्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया (Yavatmal Collector Dr. Pankaj Ashiya) यांची बदली झाली आहे. डॉ. पंकज आसिया हे 2016 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात नगरमधील (Ahilyanagar) आणखी काही वरिष्ठ अधिकार्‍यांचे बदल्याचे आदेश निघाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

डॉ. आसिया (Dr. Pankaj Ashiya) हे 2016 बॅचचे आयएएस अधिकारी (IAS Officer) असून ते जोधपूर (राजस्थान) (Jodhpur, Rajasthan) येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे वडील डॉक्टर तर आई गृहिणी आहे. वडिलांची इच्छा डॉक्टर होती. त्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले. त्यांनी कोणताही खासगी क्लास न लावता स्वयंम अभ्यास करून हे यश संपादन केले. 2016 मध्ये त्यांना देशात 56 रँकवर आयएएस मानाकंन मिळविले. त्यानंतर मालेगाव (नाशिक) (Malegaon, Nashik) येथे प्रांताधिकारी म्हणून काम करताना शहर करोना मुक्त करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले होते.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन भिवंडी महानगरपालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पदोन्नती झाली. सालीमठ यांची पुणे (Pune) येथे साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर (Additional District Collector Balasaheb Kolekar) यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारीपदा पदभार होता. जिल्हाधिकारीपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत अनेक नावे चर्चेत होते. अखेर राज्य शासनाने डॉ. आशिया यांची नियुक्ती केली आहे.

‘सार्वमत’च्या अंदाजावर शिक्कामोहर्तब
डॉ. पंकज आसिया यांच्या नावे नगरच्या जिल्हाधिकारी यांच्या पदाच्या चर्चेत असून याबाबत 2 मार्चरोजी सार्वमतने वृत्त प्रसिध्द करत डॉ. आसिया यांच्याबाबत अंदाज वर्तवला होता. हा अंदाज त्यांच्या बदलीच्या आदेशाने खरा ठरला आहे.

सात वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या
राधाविनोद शर्मा महानगर सहआयुक्त मुंबई यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी, एम. जे. प्रदीप चंद्रेन अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी, बाबासाहेब बेलदार अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर, जगदीश मिनियार मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजीनगर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना. गोपीचंद कदम मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, सोलापूर यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून. वैदेही रानडे सहव्यवस्थापकीय संचालक, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी, डॉ. अर्जुन चिखले सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव आणि नगरला डॉ. आसिया अशा सात वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गुरूवारी सांयकाळी काढण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...