Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर शहरात कोंबींग ऑपरेशन

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात कोंबींग ऑपरेशन

पहाटेच अवैध धंद्यांवर धाडी || गुन्हेगारांवर धडक कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर शहर उपविभागात शुक्रवारी (22 नोव्हेंबर) पहाटे व्यापक कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या देखरेखीत हे ऑपरेशन पहाटे 4 ते सकाळी 9 वाजेपर्यंत कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत पार पडले.

- Advertisement -

ऑपरेशनदरम्यान जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आलेले पाच गुन्हेगार कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शहरात आढळून आले. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 223 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस ठाणे अभिलेखावरील फरार किंवा पाहिजे असलेल्या संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. 12 पैकी 3 संशयित आरोपी आढळून आले असून त्यांना संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. तसेच या ऑपरेशनदरम्यान एनबीडब्लू/बीडब्लू मधील संशयित आरोपींचा शोध घेऊन तब्बल 36 वॉरंटची बजावणी करण्यात आली. त्यापैकी 10 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले.

YouTube video player

शहरातील कुख्यात गुन्हेगारांवर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस पथकांनी 17 हिस्ट्रीशीटरच्या राहत्या घरी जाऊन त्यांची तपासणी केली. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे परिसरातील गंभीर गुन्ह्यांतील दोन संशयित आरोपींना शोध लावून अटक करण्यात आली. अवैध मद्यविक्रीवर कारवाई करत पाच गुन्हे नोंद करण्यात आले. कारवाईदरम्यान देशी, विदेशी व हातभट्टी दारूसह एकूण 32 हजार 615 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक सपकाळे, प्रवीण पाटील व देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, महिला सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, उपनिरीक्षक चाहेर, दळवी व अनिल चव्हाण, तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर व अंमलदार यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...