Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : सर्व पालिकांमध्ये महिलाराज वाढणार

Ahilyanagar : सर्व पालिकांमध्ये महिलाराज वाढणार

अनेक इच्छुकांचे गणित बिघडले, सौभाग्यवतींसाठी अनेकांची मोर्चेबांधणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रणधुमाळी सुरू झाली असून श्रीरामपूर, राहुरी, देवळाली, राहाता, कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी व जामखेड नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायतच्या प्रभाग निहाय आरक्षण काल बुधवार 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रभागातील 50 टक्के जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. काहींनी आपल्या सौभाग्यवतीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यंदा प्रथमच सर्व नगरपरिषदांमध्ये निम्म्या महिला सदस्य दिसणार आहेत.

- Advertisement -

काल झालेल्या सोडतीमुळे अनेक इच्छुकांचे गणित बिघडले आहे.ज्यांना सर्वसाधारण भागाची अपेक्षा होती त्यांच्या भागामध्ये महिला किंवा नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षण पडले आहे त्यामुळे ते आता इतर ठिकाणी नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे. काही भागांमध्ये दोन्ही जागांवर आरक्षण पडल्याने या भागातील खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. नव्याने जाहीर झालेल्या प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झाल्याने या सर्व शहरातील अनेक दिग्गजांचा चांगला कस लागणार आहे. तर आरक्षण सोडत झाल्यावर आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी संभाव्य उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सोडतीनंतर आता अनेकांनी प्रभाग निश्चित करून नगरसेवक पदासाठी फिल्डिंग लावण्यास प्रारंभ केला आहे काहींना दिलासा तर काहींचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. निम्म्या जागा महिलांसाठी असल्याने आपली पत्नी, आई, बहिणीसाठी व्यूहरचना सुरू करण्यास सुरूवात केली आहे.

YouTube video player

अनेक प्रभागात फेरबदल झाल्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अनेक विद्यमान आणि इच्छुकांना डोकेदुखी ठरणार आहे. जिल्ह्यातील नगरपालिकेच्या एकूण जागांपैकी तब्बल 50 टक्के जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे. यावेळी प्रभागातही महिलाना संधी जास्त मिळणार आहे. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी काम करणाण्या महिलांना आणि निवडणुकीसाठी आर्थिक रसद पुरविणार्‍या यावेळी स्थान मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

श्रीरामपूरात 34 जागा असून 17 ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे गणित बिघडले आहे. अनेकांना अन्य प्रभागात घुसखोरी करावी लागणार आहे. प्रभाग 15 हा सर्वसाधारण राहिला असून येथे दोन्ही जागा या ओपनच्या आहेत या जागेवर महिला आणि पुरुष कुणीही उभे राहू शकतो. त्यामुळे या प्रभागात चुरस वाढणार आहे.
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून बुधवारी (8 ऑक्टोबर) नगर दक्षिणेतील निवडणुक होणार्‍या श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी व जामखेडची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. तसेच प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली असून त्यावर 13 ऑक्टोबरपर्यंत हरकत व सुचना घेण्यात येणार आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

श्रीगोंद्या नगरपरिषदतील 22 पैकी सर्वसाधारण महिला आणि पुरूषांसाठी 13 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 6 जागा, आणि अनुसूचित जातीसाठी 3 जागा असे आरक्षण काढण्यात आले आहे. शेवगाव नगरपरिषदेतील एकूण 12 प्रभागातील 24 जागांपैकी 12 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. नगराध्यक्षपदासह 12 जागांवर महिलांचा वरचष्मा राहणार आहे.

पाथर्डी नगरपरिषेतच्या आरक्षणामध्ये जवळपास सर्वच जुन्या चेहर्‍यांना परत एकदा सभागृहात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता असून नव्या पालिकेत जाऊ इच्छिणार्‍या नवीन उमेदवारांमध्ये सुद्धा खुशीचा माहोल दिसून येत आहे. पालिकेच्या मागील सभागृहात एकूण 17 नगरसेवक होते या वेळी ही संख्या वाढून 20 झाली आहे. एकूण दहा प्रभागातून प्रत्येकी दोन असे 20 नगरसेवक निवडून द्यायचे असून या पैकी दहा महिला नागरसेविका असणार आहेत. जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या 24 जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....