Tuesday, March 25, 2025
HomeनगरLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले.

- Advertisement -

लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने, महायुतीला भरघोस विजय साजरा करणे शक्य झाले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून, तो खात्यात कधी जमा होणार याची चर्चा रंगत आहे.

आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत मुदतीपर्यंत जिल्ह्यात सुमारे 11 लाख 50 हजार महिला पात्र ठरल्या आहेत. पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला.

तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते. एकही हप्ता न मिळालेल्या महिलांना पाच हप्ताचे एकुण साडेसात हजार रूपये एकाच वेळी दिले गेले.

दरम्यान, आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने, निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणुका आटोपल्यापासून, लाडक्या बहिणींच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार? याची प्रतीक्षा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लागली आहे.

दरम्यान, महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून 2100 रूपये करणार असल्याचे आश्‍वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रूपये होणार का, अशीही चर्चा बहिणींमध्ये रंगत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...