Saturday, January 24, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर महापालिकेची रणधुमाळी सुरू

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेची रणधुमाळी सुरू

17 प्रभागांत 68 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग || 15 जानेवारीला मतदान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, तब्बल सात वर्षांनंतर महापालिकेची निवडणुक होत आहे. 17 प्रभागांमधून 68 नगरसेवकांची निवड होणार असून, या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. ऐन थंडीच्या दिवसात महिनाभर अहिल्यानगर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर महापालिकेची पंचवार्षिक मुदत डिसेंबर 2023 मध्ये संपली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासकराज आहे. पहिल्यांदा तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर आयुक्त यशवंत डांगे प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने 2011 च्या जनगनना ग्राह्य धरून निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पहिल्यांदा नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. आता सोमवारी राज्यातील 29 महानगरपालिकांची निवडणुक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा लोकशाही प्रक्रियेला चालना मिळणार आहे.

YouTube video player

महापालिकेच्या 17 प्रभागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 23 डिसेंबर 2025 ते 16 जानेवारी 2026 असा निवडणुकीचा कार्यक्रम आहे. 17 प्रभागात प्रत्येकी 4 नगरसेवक असणार आहेत. त्यासाठी आरक्षण निश्चितीही झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीची तयारी करीत आहे. प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

तर, अंतिम मतदार यादीची प्रक्रियाही सोमवारी पूर्ण झाली आणि लगेच राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केल्याप्रमाणे महापालिकेच्या 17 प्रभागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर सुमारे 9 हजार 607 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्या सर्व हरकतींची स्थळ पाहणी करून निपटरा केला आहे. एकुण 3 लाख 7 हजार 009 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तशी अंतिम मतदार यादी सोमवारी आयुक्त डांगे यांनी जाहीर केली आहे.

निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखलची मुदत :23 ते 30 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्जाची छाननी : 31 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत : 2 जानेवारी 2026
उमेदवारांना चिन्ह वाटप : 3 जानेवारी 2026
उमेदवारांचा खुला प्रचार : 4 ते 14 जानेवारी 2026
मतदान : 15 जानेवारी 2026
मतमोजणी : 16 जानेवारी 2026

3 लाखांहून अधिक मतदार
महापालिका निवडणुकीसाठी शहरात एकूण 3 लाख 7 हजार 009 मतदार आहेत. यामध्ये पुरूष मतदार 1 लाख 55 हजार 523, महिला मतदार 1 लाख 51 हजार 378, तर इतर मतदार 108 आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार पुढीलप्रमाणे : प्रभाग 1 : (22,088), प्रभाग 2 : (21,513), प्रभाग 3 : (14,527), प्रभाग 4 : (19,256), प्रभाग 5 : (14,950), प्रभाग 6: (17,150), प्रभाग 7 : (15,833), प्रभाग 8 : (18,020), प्रभाग 9 : (17,159), प्रभाग 10 : (22,900), प्रभाग 11 : (20,670), प्रभाग 12 : (19,382), प्रभाग 13 : (15,723), प्रभाग 14 : (17,020), प्रभाग 15 : (16,656), प्रभाग 16 : (18,874), प्रभाग 17 : (15,288).

इच्छुकांच्या जोरदार हालचाली
2018 मधील महापालिका निवडणुकीत शिवसेना (एकत्रित) 23, राष्ट्रवादी (एकत्रित) 18, भाजपा 16, काँग्रेस 5, बसपा 4, सपा 1 आणि अपक्ष 1 अशी स्थिती होती. या पार्श्वभूमीवर यावेळी कोणत्या पक्षाला शहराचा कौल मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतरची ही निवडणुक होत आहे. महायुती व महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार की स्वतंत्र लढणार यावर येत्या काही दिवसांत निर्णय अपेक्षीत आहे. निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी हालचाली वाढवल्या असून, पक्षांतर्गत बैठका, मोर्चेबांधणी आणि उमेदवार निवडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. आगामी काळात अहिल्यानगरचे राजकारण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

आरक्षणाचा मोठा प्रभाव
या निवडणुकीत आरक्षणाचाही मोठा प्रभाव दिसून येणार आहे. अनुसूचित जातींसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 18, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 जागा आहेत. यामध्ये महिलांसाठी एकूण 34 जागा राखीव असल्याने अनेक महिला इच्छुक रिंगणात उतरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रारूप मतदार यादीवर आलेल्या सर्व हरकतींच्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. ज्या मतदारांबाबत हरकती होत्या, त्यांना भेट देऊन खातरजमा करण्यात आली असून, खरी व प्रामाणिक हरकती विचारात घेऊनच अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
– यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका.

7 वर्षांनंतर नगर महापालिकेची निवडणूक जाहीर

राजकीय हालचालींना येणार वेग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने ऐन कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. तब्बल सात वर्षांनंतर महापालिकेची निवडणुक होत आहे. 17 प्रभागांमधून 68 नगरसेवकांची निवड होणार असून, या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अहिल्यानगर महापालिकेची पंचवार्षिक मुदत डिसेंबर 2023 मध्ये संपली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासकराज आहे. पहिल्यांदा तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी प्रशासक म्हणून कामकाज पाहिले.

त्यानंतर आयुक्त यशवंत डांगे प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने 2011 च्या जनगणना ग्राह्य धरून निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान होवून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीची तयारी करीत आहे. प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर, अंतिम मतदार यादीची प्रक्रियाही सोमवारी पूर्ण झाली आणि लगेच राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केल्याप्रमाणे महापालिकेच्या 17 प्रभागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत आरक्षणाचाही मोठा प्रभाव दिसून येणार आहे. अनुसूचित जातींसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 18, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 जागा आहेत. यामध्ये महिलांसाठी एकूण 34 जागा राखीव असल्याने अनेक महिला इच्छुक रिंगणात उतरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निवडणूक अधिकार्‍याकडे प्रत्येकी तीन प्रभाग
महापालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी सहा निवडणूक निर्णय अधिकारी व सहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती असून निवडणूक अधिकार्‍यांकडे प्रत्येकी तीन प्रभागंची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक निवडणूक अधिकार्‍यांची कार्यालय देखील सज्ज करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा पवार, उपजिल्हाधिकारी अतूल चोरमारे, उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार नागेश गायकवाड, तहसीलदार शोभा पुजारी, तहसीलदार योगेश शिंदे, तहसीलदार शीतल साळवे, तहसीलदार हिमालय घोरपडे व तहसीलदार संजय शिंदे यांची विभागीय आयुक्तांनी नियुक्ती केली आहे. चार सदस्यांच्या प्रत्येकी तीन प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी व सहाय्यक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. महापालिकेचे 17 प्रभाग असून 68 सदस्य संख्या आहे. मतदान केंद्रेही निश्चित करण्यात येणार आहेत. त्यांच्या निवडणूक कार्यालयांची ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

2018 मधील स्थिती
2018 मधील महापालिका निवडणुकीत शिवसेना (एकत्रित) 23, राष्ट्रवादी (एकत्रित) 18, भाजपा 16, काँग्रेस 5, बसपा 4, सपा 1 आणि अपक्ष 1 अशी स्थिती होती. या पार्श्वभूमीवर यावेळी कोणत्या पक्षाला शहराचा कौल मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतरची ही निवडणुक होत आहे. महायुती व महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला समोरे जाणार की स्वतंत्र लढणार यावर येत्या काही दिवसांत निर्णय अपेक्षीत आहे. निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी हालचाली वाढवल्या असून, पक्षांतर्गत बैठका, मोर्चेबांधणी आणि उमेदवार निवडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो-२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik दैनिक ‘देशदूत’ आयोजित आणि गंगापूर रोड व परिसरातील गृहप्रकल्पांवर आधारित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चा दुसरा दिवस नाशिककरांच्या गर्दीने आणि उत्साहाने...