Wednesday, September 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूज‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो-२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो-२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दैनिक ‘देशदूत’ आयोजित आणि गंगापूर रोड व परिसरातील गृहप्रकल्पांवर आधारित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चा दुसरा दिवस नाशिककरांच्या गर्दीने आणि उत्साहाने गाजला. अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या उपस्थितीत झालेल्या दिमाखदार उद्घाटनानंतर, शनिवारी सुटीचा आनंद घेत अनेक कुटुंबांनी आपल्या स्वप्नातील घराचा शोध घेण्यासाठी या प्रदर्शनाला भेट दिली.

- Advertisement -

गंगापूर रोडसह आनंदवल्ली, सिरीन मेडोज, धृवनगर आणि चांदसी यांसारख्या उच्चभ्रू भागांतील विविध गृहप्रकल्प एकाच छताखाली उपलब्ध आहेत. सामान्य नाशिककरांच्या बजेटमधील घरांपासून ते अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशा लक्झरी पेंटहाऊस आणि विलापर्यंतचे सर्व पर्याय येथे पाहायला मिळत आहेत. प्रदर्शनातील मांडणी आणि प्रकल्पांची माहिती देण्याची पद्धत अतिशय पारदर्शक असल्याची प्रतिक्रिया भेट देणाऱ्या नागरिकांनी दिली.

प्रदर्शनाचे शेवटचे 2 दिवस
उद्या (दि.२५) आणि परवा (दि.२६) सुटी असल्याने गर्दीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांना स्वतःचे हक्काचे घर घ्यायचे आहे, त्यांनी दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘देशदूत’च्या वतीने करण्यात आले आहे. सर्वांना येथे मोफत प्रवेश आहे.

प्रदर्शन सोमवार (दि. २६) पर्यंत ब्रम्हेचा इस्टेट, सावरकर नगर कॉर्नर, भोसला मिलिटरी कॉलेज समोर, गंगापूररोड येथे भरविण्यात आले आहे. टायटल स्पॉन्सर ‘दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ तर को स्पॉन्सर ‘ठक्कर ग्रुप लिमिटेड (टिजीएल)’ हे आहेत. येथे बजेट होमपासून ते अतिशय आलिशान फ्लॅट्स, रो-हाउसेस, रो बंगलो, तसेच एन.ए. प्लॉट्सचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ठक्कर ग्रुप लिमिटेड (टिजीएल), पार्कसाईड रेसिडेन्सी, रोहन इंटरप्रायझेस, निशम डेव्हलपर्स, सेवा रियल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, साठे बिल्डर्स, की स्टोन कन्स्ट्रक्शन, आकार बिल्डकॉन, कोटकर ब्रदर्स, अर्बन साइट्स, अमित लाईफ स्पेस एलएलपी, ए.एम.आर. डेव्हलपर्स, अनंतारा, पूजा कन्स्ट्रक्शन्स, बी-ऑर्बिट ग्रुप, सी.डी.आय.एल.-फार्म प्लॉट्स, राजेंद्र बिल्डर्स, महाकाल बिल्डर्स, सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ऋषीराज बिल्डर्स, मिन्का रिव्हरडेल, नंदन बिल्डर्स, श्रीयोग बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री बालाजी डेव्हलपर्स, शिल्पा इस्टेट

ताज्या बातम्या

MPSC च्या अभ्यासाचा ताण अन् अडीच लाखांचे कर्ज; पुण्यात धाराशिवच्या विद्यार्थ्याची...

0
पुणे । Pune स्पर्धा परीक्षेचे 'माहेरघर' मानल्या जाणाऱ्या पुण्यातून एक अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. राज्यभरात एकीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या...