Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये मतदानाला संमिश्र प्रतिसाद; पहिल्या चार तासांत...

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये मतदानाला संमिश्र प्रतिसाद; पहिल्या चार तासांत ‘एवढे’ मतदान झाले

अहिल्यानगर । प्रतिनिधी

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. थंडीचा कडाका असूनही शहरात मतदारांचा उत्साह पाहायला मिळत असून पहिल्या चार तासांत, म्हणजेच सकाळी ११:३० वाजेपर्यंत सरासरी २०.१६ टक्के मतदान झाले आहे.

- Advertisement -

सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केंद्रांवर संमिश्र प्रतिसाद दिला. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सकाळी ११:३० वाजेपर्यंत एकूण ६१,८८१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ३४,७७५ पुरुष, २७,१०३ महिला आणि ३ इतर मतदारांचा समावेश आहे. सकाळी साडेसात ते साडे नऊ या सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाची गती काहीशी संथ होती, मात्र त्यानंतर मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.

YouTube video player

शहरात सध्या कडाक्याची थंडी असूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी सकाळी लवकर मतदान करण्यावर भर दिला. प्रशासनाने मतदान प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त आणि व्यवस्था केली असून, मतदान शांततेत सुरू आहे. मतदानाची ही टक्केवारी पाहता, दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रशासनाने नागरिकांना मोठ्या संख्येने बाहेर पडून आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ नंतर मतदानाचा वेग कसा राहतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

श्रीनावास

Ajit Pawar Death: अजितदादांचे कोणतेही धार्मिक विधी होणार नाही; भाऊ श्रीनावास...

0
बारामती | Baramatiमहाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. येत्या ६ जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे...