अकोले | प्रतिनिधी | Akole
- Advertisement -
अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar District) अकोले तालुक्यातील (Akola Taluka) ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) येथे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी वीरमरण प्राप्त केलं आहे.
संदीप गायकर (Sandeep Gaikar) हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते. आपल्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राणांची आहुती देऊन देशसेवा केली. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव, अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.