अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar
अज्ञात वाहनाच्या धडकेत (Vehicle Hit) बिबट्या गंभीर जखमी होऊन मृत झाल्याची घटना अहिल्यानगर-पुणे महामार्गावर (Ahilyanagar Pune Highway) कामरगाव शिवारात मंगळवारी (दि.11) घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी, कामरगाव येथे अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सकाळी 6.00 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नर जातीचा बिबट्या (Leopard) गंभीर जखमी झाला. बराच काळ तो बिबट्या गंभीर जखमी (Injured) अवस्थेत रस्त्यावर पडून होता.
कामरगाव (Kamargav) शिवारातील काळ्याच्या डोंगराकडून नगर पुणे महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाचा धक्का लागून बिबट्या (Leopard) गंभीर जखमी झाला होता. त्या अवस्थेतही रस्ता पार करून तो रस्त्याच्या कडेला निपचित पडला. ही माहिती नवनाथ ठोकळ आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकार्यांना कळविली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाथ तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक कृष्णा गायकवाड व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून बिबट्याला ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केले. मात्र, त्यानंतर बिबट्याचा मृत्यू (Leopard Death) झाल्याचे वनविभागाने (Forest Department) सांगितले. दरम्यान, वाहनचालकांनी घटनास्थळी वाहने थांबून मोठी गर्दी (Crowd) केली होती. अनेक लोक बिबट्याचे व्हिडिओ काढत होते. भल्या सकाळी व्हिडिओ व्हायरल होताच त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.




