Sunday, May 25, 2025
HomeनगरRain News : नगरमध्ये पावसाच्या सरीवर सरी

Rain News : नगरमध्ये पावसाच्या सरीवर सरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

नगर शहरात गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी सुरू आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या पावसाचे प्रमाण वाढले असून रविवारी दिवसभर नगर शहर व उपनगरात पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. यामुळे सुट्टीचा दिवस असल्याने नगर शहर (Ahilyanagar City) काहीसे ठप्प झाल्याचे दिसून आले. दरम्यान वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जून महिन्यांत असणारे वातावरण मे महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात नगरकरांनी पहिल्यांदा अनुभवले.

यंदा नगर जिल्ह्यात मे महिन्यांच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाचा तडाखा सुरू आहे. जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यात या पावसाची हजेरी असून अनेक ठिकाणी वादळामुळे पिकांची नुकसान (Storm Crops Loss) झालेले आहे. नगर शहर उपनगर आणि तालुक्यात देखील गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी असून आता या पावसाचा परिणाम नगरकरांवर होताना दिसत आहे. रविवारी पहाटेपासून नगरमध्ये पावसाच्या थांबून थांबून सरीवर सरी उसळत होत्या. या पावसामुळे शहरातील रस्त्यासह सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. नगर शहरात यंदा लवकरच पाऊस सुरू झाल्याने मनपाचे नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नसल्याने अनेक ठिकाणी आत्तापासून पावसाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत होते.

दरम्यान नगर शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे कामे सुरू असून अद्याप ते पूर्ण झाली नसल्याने पावसाच्या ठिकाणी नागरिकांना त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली. यामुळे यंदा देखील नगरकरांना पावसाच्या पाण्याचा प्रश्न सतावणार आहे. दरम्यान रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नगरकरांनी पडणार्‍या पावसामुळे घरात राहणे पसंत केले. नगर शहरासह नगर तालुक्यात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली असून शेतात सध्या पाण्याचे तळे साचलेले दिसत होते.

डोंगरगणचे धबधबे प्रवाहित
नगर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी त्याचे प्रमाण अधिक आहे. या पावसामुळे वांबोरी (Vambori)-डोंगरगण (Dongargan)घाटातील धबधबे (Waterfalls) मे महिन्यात प्रवाहित झाले आहे. या ठिकाणी डोंगराच्या कानकोपर्‍यातून पाणी जमिनीकडे वाहतांना दिसले. रविवारी दुपारी नगरच्या अनेक पर्यटकांनी डोंगरगण, मांजरसुंबा परिसरात धाव घेत निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

0
  नाशिक । प्रतिनिधी Nashik महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोमवारपासून (दि.२६) दोन दिवस दौऱ्यावर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग...