Friday, November 22, 2024
Homeनगर14 तारखेपर्यंत नगरला यलो अलर्ट

14 तारखेपर्यंत नगरला यलो अलर्ट

राज्यात तीव्र कमी दाब क्षेत्रातून पावसाची शक्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केरळ किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्र सध्या लक्षद्विपवरून अरबी समुद्राच्या मध्यावर पोहोचत आहे. परिणामी 13 ऑक्टोबरदरम्यानच्या मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात भाग बदलत दुपारनंतर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दुसरीकडे हवामान विभागाकडून नगर जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस म्हणजे 14 तारखेपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील पाऊस आणि हवामानाबाबत माहिती देताना खुळे यांनी स्पष्ट केले की राज्यातील पाऊस अजून नंदुरबारपर्यंतच जागेवर खिळलेला आहे.

- Advertisement -

सध्या पडणार्‍या पावसामुळे शेती पिकांना व फळबागांना अपाय होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यातील दुसर्‍या आवर्तनातील पावसापासून म्हणजे मंगळवार 22 ऑक्टोबरनंतर होणार्‍या पावसाचा कोकणातील शेतपिके व फळबागांना फायदा होणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या भूभागावर ताशी 28 तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ताशी 37 किमी वेगाने पूर्वेकडून अरबी समुद्रातील हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे वारे वाहत आहे. दोन्हीही समुद्रातून होणार्‍या बाष्प पुरवठ्यामुळे रविवार 13 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राबरोबर मुंबईसह कोकणातही हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनसह अन्य पिकांची सोंगणी आणि मळणी सुरू आहे. यामुळे पडणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचे असल्याने शेतकर्‍यांना तयार होणार्‍या पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

सलग दुसर्‍या दिवशी पाऊस
नगर शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला (बुधवारी) आणि त्यानंतर गुरूवारी सातव्या माळेला (गुरूवारी) पावसाने हजेरी लावली. हा पाऊस दुपारी उशीरानंतर सायंकाळपर्यंत जोरदारपणे बरसला. यामुळे देवीच्या दर्शनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या