Tuesday, January 6, 2026
Homeनगर‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय!

‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय!

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

शहरातील तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अहिल्यानगर- मनमाड रस्त्यालगत असलेल्या ‘अँक्यूम मसाज पार्लर/स्पा सेंटर’वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (एएचटीयु) छापा टाकून एका मोठ्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करवून घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. अनिकेत अशोक बचाटे (वय 27, रा. जिनती, कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर, हल्ली रा. अहिल्यानगर) व महेश अमित सुंदराणी (वय 20, रा. ब्राम्हणगल्ली, माळीवाडा, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

YouTube video player

गुरूवारी (11 डिसेंबर) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. मनमाड रस्त्यावरील अँक्यूम स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाईची योजना आखली. दोन सरकारी पंचांना सोबत घेऊन बनावट ग्राहक तयार करण्यात आला आणि त्याला स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. बनावट ग्राहकाने खात्री करून माहिती दिल्यानंतर सायंकाळी स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला.

छाप्यादरम्यान, स्पा सेंटरचा व्यवस्थापक अनिकेत अशोक बचाटे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत वेश्याव्यवसायातून कमावलेली रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तसेच, एका खोलीत ग्राहक महेश अमित सुंदराणी याच्यासोबत एक महिला आढळली. याशिवाय, इतर एका खोलीत तीन महिला मिळून आल्या. पोलिसांनी या ठिकाणाहून पाच पिडीत महिलांची सुटका केली आहे.

या महिला वेगवेगळ्या ठिकाणच्या असून त्यांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आले होते. या महिलांकडून शरीरसंबंधासाठी घेतलेली रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आली आहेत. अनिकेत बचाटे आणि ग्राहक महेश सुंदराणी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...