अहिल्यानगर । प्रतिनिधी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल 91.85 टक्के लागला असून या परीक्षेतही मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे दिसून आले आहे.
मुलांचा 89.29 तर मुलींचा 95.03 टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 67 हजार 358 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 66 हजार 858 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 61 हजार 412 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात श्रीगोंदा, संगमनेर व अकोले या तीन तालुक्यांत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
तालुकानिहाय निकाल
अकोले 95.05, जामखेड 93.81, कर्जत 94.18, कोपरगाव 93.37, अहिल्यानगर 93.07, नेवासा 88.64, पारनेर 94.54, पाथर्डी 86.77, राहाता 90.98, राहुरी 91.99, संगमनेर 95.56, शेवगाव 80.66, श्रीगोंदा 95.02, श्रीरामपूर 90.33. एकूण निकाल 91.85 टक्के.