Tuesday, February 3, 2026
Homeनगरनगरच्या गाळप हंगामाचे शुक्रवारी ठरणार नियोजन

नगरच्या गाळप हंगामाचे शुक्रवारी ठरणार नियोजन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

मंत्री समितीच्या बैठकीनंतर राज्यातील साखर कारखान्याचे बॉयलर १ नोव्हेंबरपासून पेटणार आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर नियोजन उरकण्यात येत असताना आधी परतीच्या आणि आता चक्रीवादळामुळे पडणाऱ्या पावसाचा परिणाम गाळप हंगामाच्या नियोजनावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारीचे धोरण ठरवण्यासाठी ३१ ऑक्टोंबरला नगरला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत गाळप हंगाम पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मंत्री समिती आणि आयुक्तालयाच्यावतीने साखर साखर कारखान्यांच्या ऊस गाळापासाठी गाळप परवाना सक्तीचा करण्यात आलेला आहे. नगर जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप परवाना काढण्याचे काम प्रगतीपथावर असून यंदाच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रती टन उसातून किती कपात करावी, याबाबत मार्गदर्शन आल्यावर त्याबाबत प्रत्येक कारखाना व्यवस्थापनला कळवल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

YouTube video player

शेतकरी संघटनेसह ऊस उत्पादक बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. शुक्रवार (दि. ३१) रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गाळप नियोजन बैठकीत जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनाचे पदाधिकारी यांच्यासह उत्पादक उपस्थित राहणार असून यावेळी प्रामुख्याने ऊस दर, गाळपात येणाऱ्या अडचणी, गेटकिन पध्दत, तोडणी मजूरांकडून होणारी आर्थिक पिळवणूक यासह ऐनवेळी अन्य बाबींवर चर्चा होणार आहे.

गाळप हंगामासाठी दिवाळीच्या दरम्यान, अनेक कारखान्यांनी बॉयलरची पूजा करून हंगामासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिलेले आहे. मात्र, साखर आयुक्तालय आणि सरकारकडून अद्याप काही बाबींवर स्पष्ट निर्देश नसल्याने कारखान्यांसह संबंधीत प्रशासकीय यंत्रणा गोंधळलेली दिसत आहे. हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघा दोन दिवसांचा कालावधी राहिला असून जिल्हा प्रशासनाने देखील ऐन हंगामाच्या तोंडावर गाळप नियोजन बैठक बोलावल्याने

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या ऊसाला २०२५-२६ साठी ३ हजार ५५० रुपये एफआरपी जाहीर केलेली असून शेतकरी संघटनांनी मात्र ३ हजार ६०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळावा, असा आग्रह धरलेला आहे. यात जिल्ह्यातील साखर कारखाने काय निर्णय घेणार याकडे शुक्रवारी नगरला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या हंगाम पूर्व नियोजन बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

हंगाम उशीरा सुरू होण्याची शक्यता

नगर जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टीसह पूर परिस्थिती निर्माण करणारा पाऊस झालेला आहे. यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात ऊस पिक, रस्ते, पूल, बंधारे यांचे नुकसान झालेले आहे. यातून सावरत असताना पुन्हा चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. यामुळे नगर जिल्ह्यात १ नाव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु करतांना कारखान्यांसमोर अडचणी येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ३० ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. यामुळे यंदा नगरमध्ये यंदा ८ ते १५ दिवस गाळप उशीरा सुरू होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

कारखाने, मजूर सज्ज

जिल्ह्यातील साखर कारखाने गाळप हंगामासाठी सज्ज झालेले असून अनेक ठिकाणी तोडणी कामगारांच्या टोळ्या दाखल झालेल्या आहेत. मात्र, चक्रीवादळामुळे पाऊस कोसळत असून यामुळे कारखाना व्यवस्थापन, मजूर ऊसतोडणीच्या तयारी असतांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. विशेष करून नगर दक्षिणेतील तालुक्यात परिस्थिती खराब आहे.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...