Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar : नूतन सीईओ भंडारी आज घेणार पदभार

Ahilyanagar : नूतन सीईओ भंडारी आज घेणार पदभार

पालकमंत्री विखे पाटील यांच्या आषाढी वारी नियोजन बैठकीला उपस्थिती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची पदोन्नतीने अमरावती जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर पुणे येथून जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि भूमी अभिलेखचे अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची बदली झाली असून ते आज (दि.26) रोजी पदभार स्वीकारणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नगर जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढ वारी नियोजन बैठक होणार असून या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी उपस्थित राहणार आहेत. भंडारी हे पुण्यातील जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते. मागील वर्षी त्यांची ग्रामविकास सेवेतून भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर काम केले आहे. आता त्यांची नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली असून नगर सारख्या बड्या जिल्ह्यात त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.

YouTube video player

दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांना अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता आहे. या काळात भंडारी यांना प्रशासक या नात्याने पूर्णपणे स्वातंत्र्याने काम करता येणार आहे. यंदा लवकरच पावसाळा सुरू झाला असून यामुळे शेतकर्‍यांसह ग्रामीण भागात आरोग्य, शैक्षणिक सुविधा याकडे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांना लक्ष द्यावे लागणार आहे. जुने मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी सुरू केलेल्या मिशन आपुलकी, मिशन आरंभ, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांमध्ये वाढलेला विद्यार्थ्यांची गुणवत्ता, याशिवाय कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी त्यांनी सुरू केलेली क्यूआर कोडप्रणाली या योजना सुरळीत सुरू ठेवण्यासोबत नवीन योजना राबवाव्या लागणार आहेत. अमरावतीला पदोन्नतीवर बदली झालेले येरेकर यांचा आज नगरमध्ये निरोप समारंभ ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...