Monday, January 26, 2026
Homeमुख्य बातम्याAhmedabad Air India Plane Crash : विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा आला समोर;...

Ahmedabad Air India Plane Crash : विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा आला समोर; किती जणांनी गमावला जीव?

नवी दिल्ली | New Delhi

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे (Air India) १७१ हे विमान अहमदाबादहून (Ahmedabad) लंडनला जात असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात हे प्रवासी विमान (passenger aircraft) कोसळलं असून या दुर्घटनेत आतापर्यंत ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या दुर्घटनेत विमानाच्या ढिगाऱ्यातून ५० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच मदत आणि बचाव कर्मचारी आग विझवण्याचे काम करत आहेत. तर ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमी आणि मृतांचा शोध घेतला जात आहे.

YouTube video player

दरम्यान, एअर इंडियाच्या या विमानात १६९ भारतीय तर ५३ ब्रिटन नागरिक होते.  तसेच या दुर्घटनेत १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले. तर अपघातग्रस्त विमान रुग्णालयाच्या इमारतीवर कोसळल्याने त्यामध्ये १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदी तातडीने अहमदाबादच्या दिशेने रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या अपघातानंतर तातडीनं अहमदाबादच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी अपघाताबद्दल चर्चा केली आहे. मोदींनी शहांना अहमदाबादला जाण्याच्या सूचना केल्या आहेत.

विमानाचे पायलट होते सुमीत सरभवाल

एएनआयने डीजीसीएच्या माहितीनुसार सांगितले की, एअर इंडियाच्या या अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुमीत सरभवाल होते. त्यांना ८२०० तासांचा विमान उडवण्याचा एलटीसी म्हणून अनुभव आहे. तसेच त्यांना ११०० तासांचा सहपायलट म्हणून उड्डाणाचा अनुभव आहे. टीसीने सांगितल्यानुसार या विमानाने अहमदाबादच्या (Ahmedabad Plane Crash) रनवे २३ वरून भारतीय वेळेनुसार १ वाजून ३९ मिनिटांनी उड्डाण ghetle होते. त्यानंतर लगेचच हे विमान तळाच्या परिघा बाहेर एका इमारतीवर पडले. त्यानंतर तेथे आगीचे मोठे लोट निर्माण झाले होते.

अपघात नेमका कसा झाला?

फ्लाइट एआय १७१ अहमदाबादहून लंडनला जात होती. अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर कोसळलं. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचे बोलले जातं आहे. तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जातं आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ जानेवारी २०२६ – प्रजेची मूलभूत जबाबदारी

0
आज आपल्या देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिवस. दरवर्षी हा दिवस समाज उत्साहात साजरा करतो. करायलाही पाहिजे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असा देशाचा जगात लौकिक...