Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAhmedabad Air India Plane Crash : विमान अपघातानंतर पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शोक...

Ahmedabad Air India Plane Crash : विमान अपघातानंतर पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली | New Delhi

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे (Air India) १७१ हे विमान अहमदाबादहून (Ahmedabad) लंडनला जात असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या विमान अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. या अपघातानंतरचे जे दृश्य समोर येत आहेत ते अतिशय सुन्न करणारे आहेत. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक्सवर पोस्ट करत सदंर दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, “अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने आपल्याला धक्का बसला असून अतीव वाटत आहे. हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही. या घटनेमुळे बाधित झालेल्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. बाधितांना मदत करण्यासाठी काम करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

देवेंद फडणवीस, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवारांकडून शोक व्यक्त

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaavis) यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, अहमदाबाद विमानतळावर एअर इंडिया प्रवासी विमान अपघाताची बातमी ऐकून खूप दुःख आणि धक्का बसला आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, “गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “अहमदाबाद येथील भीषण विमान अपघात अतिशय धक्कादायक आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. गुजरात प्रशासन मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य करत असून विमानातील वाचलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले जात आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. या भयंकर दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असे त्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसंच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू ही धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना आहे. अहमदाबाद शहरातील या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी असून मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक महाराष्ट्रवासी सहभागी आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : घुमल्या घोषणा, दाटली गर्दी; नाशिकमधून ‘लाल वादळ’ मुंबईच्या...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati शेतकरी (Farmer) आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा (Kisaan Sabha)...