Thursday, February 5, 2026
HomeUncategorizedAhmedabad Air India Plane Crash : टाटा ग्रुप कडून विमान अपघातातील मृतांच्या...

Ahmedabad Air India Plane Crash : टाटा ग्रुप कडून विमान अपघातातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर

 

Ahmedabad Air India Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच विमान कोसळल्याची मोठी विमान दुर्घटना आज घडली. 242 प्रवाशांसह लंडनसाठी उड्डाण घेतलेलं हे विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात अचानक बी जे मेडिकलच्या वस्तीगृहावर कोसळलं अन् मोठा स्फोट झाला. या स्फोटात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक प्रवासी या अपघातात सुदैवाने वाचला आहे . दरम्यान, विमान बी जी मेडिकल कॉलेजवर कोसळल्याने कॉलेज मधील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी विमान अपघातानंतर टाटा ग्रुपने अपघातातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

- Advertisement -

या दुर्दैवी घ्त्नेनान्त्र टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त करत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. तर, विमान अपघातात कोसळलेल्या अहमदाबादमधील बी जे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे.

YouTube video player

 

ताज्या बातम्या

Crime News : शिक्षिकेची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar टेलिग्रामवर हॉटेल रेटिंग व ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून खासगी महाविद्यालयातील शिक्षिकेची तब्बल 5 लाख 45 हजार 968...