Tuesday, March 25, 2025
Homeनगरताशी 130 कि.मी. वेगाने धावली नगर-बीड-परळी रेल्वे

ताशी 130 कि.मी. वेगाने धावली नगर-बीड-परळी रेल्वे

अहमदनगर । प्रतिनिधी

नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अंमळनेर (भांड्याचे) ते विघनवाडी 30 किलोमीटर अंतराची चाचणी ताशी 130 कि.मी वेगाने शुक्रवारी (दि.9) रोजी घेण्यात आली.

- Advertisement -

लवकरच नगर ते बीडपर्यंत लोहमार्गचे काम पूर्ण होणार असून 95 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा व सुखकर होणार, असल्याचे उपमुख्य अभियंता बांधकाम राकेशकुमार यादव यांनी सांगितले. अमळनेर (भांड्याचे) ते विघनवाडी लोहमार्गाची चाचणी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : Pune Hit And Run : पुन्हा ‘हिट अँड रन’, चारचाकीने दुचाकीस्वाराला नेलं फरफटत

यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उपमुख्य अभियंता यादव, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस. सुरेश, कार्यकारी अभियंता अवधेश मीना, सीनियर सेक्शन इंजिनिअर विद्याधर धांडोरे, सिनियर सेक्शन इंजिनिअर सत्येंद्र रा. कुवर, सिनियर सेक्शन संजय श्रीवास्तव, एक्झिकेटीव, इंजिनिअर आदी उपस्थित होते.

यावेळी यादव म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी नगर ते नारायणडोह, नारायणडोहा ते सोलापूरवाडी, सोलापूरवाडी ते आष्टी, आष्टी ते अंमळनेर या मार्गाची चाचणी घेण्यात आली होती. शुक्रवारी 30 किलोमीटर रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची प्रतिक्षा आता संपणार आहे.

हे ही वाचा : पुण्यात भरचौकात गुंडाचा दगडाने ठेचून खून, पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

या सर्व लोहमार्गामध्ये डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे.तसेच या महत्त्वकांक्षी रेल्वे मार्गामध्ये अनेक मोठे पूल बांधण्यात आले आहेत. त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वे सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आले आहेत. 500 मीटर लांबीचे व 18 मीटर उंचीचे नऊ मोठे पूल बांधण्यात आले आहेत.

शुक्रवारी झालेल्या चाचणीमध्ये या रेल्वे लोहमार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण होण्यास एक वर्ष कालावधी लागू शकतो असेही त्यांनी म्हटले.

हे ही वाचा : विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडणार; ‘या’ तारखांपासून महायुती, महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटणार

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...