Friday, May 3, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात आज ‘ऐवढ्या’ करोना बाधितांची वाढ

नगर जिल्ह्यात आज ‘ऐवढ्या’ करोना बाधितांची वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 101 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 68 हजार 799 इतकी झाली आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.24 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 109 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 875 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 49, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 41 आणि अँटीजेन चाचणीत 19 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 14, जामखेड 01, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 06, नेवासा 01, पारनेर 02, पाथर्डी 02, राहता 06, संगमनेर 11, श्रीगोंदा 03 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 08, जामखेड 01, नगर ग्रामीण 18, पारनेर 05, पाथर्डी 01, राहाता 02, राहुरी 03, संगमनेर 02 आणि श्रीगोंदा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 19 जण बाधित आढळुन आले. यामध्ये कर्जत 01, नगर ग्रामीण 08, नेवासा 02, राहाता 01, राहुरी 05, संगमनेर 01 आणि कँटोन्मेंट बोर्ड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 28, कोपरगाव 15, नगर ग्रामीण 10, नेवासा 02, पारनेर 06, पाथर्डी 06, राहाता 07, राहुरी 04, संगमनेर 06, शेवगाव 01, श्रीगोंदा 10, कँटोन्मेंट बोर्ड 02 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 68799

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 875

* मृत्यू : 1076

* एकूण रूग्ण संख्या : 70750

- Advertisment -

ताज्या बातम्या