Friday, May 3, 2024
HomeनगरVideo : लसीकरणासाठी महापालिकेचा नियोजनशून्य कारभार

Video : लसीकरणासाठी महापालिकेचा नियोजनशून्य कारभार

अहमदनगर | Ahmednagar

करोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. याच बरोबर करोना प्रतिबंधक लसीकरण करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

करोना लसीकरणासाठी शासनाच्यावतीने कालपासून (१ मे) १८ वर्ष ते ४४ वर्षी पर्यतच्या नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आज दुसऱ्या दिवशी लसीकरण केंद्र उशिरा सुरू झाल्याने नागरिकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. यातून लसीकरणासाठी महापालिकेचा नियोजनशून्य कारभार दिसून आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या