अहमदनगर (प्रतिनिधी)
बोल्हेगाव उपनगरात राहत असलेल्या व येथील एका खासगी रूग्णालयात परिचारीका म्हणून काम करणार्या महिलेला तिच्या परिसरातीलच पती-पत्नीने त्रास देऊन शारिरीक व मानसिक छळ करून मारहाण केली.
तसेच मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने यासंदर्भात गुरूवारी (2 फेब्रुवारी) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेती महामंडळाचा कर्मचारी लाच लुचपतच्या जाळ्यात
दिलेल्या फिर्यादीवरून किरण हरीभाऊ साबळे व त्याची पत्नी दिपाली साबळे (दोघे रा. बोल्हेगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण साबळे हा मागील काही दिवसांपासून शारिरीक वासणेपाई व पैसे लुबाडणेपाई मैत्रीचा बहाणा करून फिर्यादीला मोबाईलवर फोन व वाईट मेसेज करून त्रास देत आहे.
अबुधाबीहून केरळला येणाऱ्या Air India च्या विमानाला हवेतंच लागली आग अन्…
किरण व त्याची पत्नी रात्री अपरात्री मारहाण करून त्याचे व्हिडीओ चित्रिकरण सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. आरोग्य विभागात नोकरीला असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीकडे मोबाईलमध्ये असलेले पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मोबाईल काढून घेतला. तसेच घरात ठेवलेले तीन लाख रूपयेही सहकार्यांच्या मदतीने काढून घेतले असल्याचे फियार्र्दीत म्हटले आहे.
राणेंच्या अडचणी वाढणार? राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस