Tuesday, December 3, 2024
Homeनगरलाल कांद्याची आवक वाढली ‘उन्हाळी’च्या दरात तेजी

लाल कांद्याची आवक वाढली ‘उन्हाळी’च्या दरात तेजी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत आणखी वाढ होऊ लागली असून काहीसे भाव कमी झाले आहेत. पण नंबर एक उन्हाळ कांद्याची आवक कमी होत असल्याने जिल्ह्यात प्रति क्विंटल 6100 रुपयांपर्यंत तर कोल्हारात 7000 रुपयांवर टिकून आहेत. कांद्याच्या दराने पुन्हा एकदा सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. किरकोळ बाजारात कांदा दर सध्या प्रति किलोमागे 40 ते 80 रुपये इतके आहे. नवीन पीक येऊ लागल्याने भाववाढीला काहीसा ब्र्रेक लागला आहे.

- Advertisement -

सोलापपुरात काल सोमवारी 57 हजार 666 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. भाव 300 ते 6700 रूपये होता. गत आठवड्यात लाल कांद्याचे भाव 7200 रूपयांपर्यंत होते. संगमनेरात 11113 क्विटल कांद्याची आवक झाली. 1000 ते 5451 रूपयांचा दर मिळाला. वांबोरीत 2613 क्विंटल आवक झाली. दर 200 ते 4500 रूपयांपपर्यंत मिळाला.
लाल कांद्याची आवक वाढु लागल्याने या कांद्याच्या दरात काहीशी घट झाली आहे. पण उन्हाळ कांद्याची आवक कमी झाल्याने या कांद्याचे दर अजूनही तेजीत आहेत.

जिल्ह्यासह राज्यात उन्हाळ कांद्याचे दरात तेजी कायम आहे. कोल्हापूर, वीटा, सातारा येथे सर्वाधिक म्हणजे 7000 रूपयांपर्यंत दर मिळाला. जुन्नरला 2500 ते 6600, वांबोरी 500 ते 6100, शेवगावात 3 क्विंटल वक्कलला 6500 रूपयांचा, संगमनेरात 2000 ते 6000, नाशिक 5000 ते 6451, जुन्नर येथे 1600 ते 6550 रूपयांचा भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या