Monday, June 24, 2024
Homeनगरकोठला येथे गोमांस विक्रेत्यावर छापा

कोठला येथे गोमांस विक्रेत्यावर छापा

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

तोफखाना पोलिसांनी गुरूवारी (दि. 7) सायंकाळी कोठला परिसरातील गोमांस विक्रेत्यावर छापा टाकून कारवाई केली. 80 किलो गोमांस, वजनी काटा व सत्तुर असा 17 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मतिन गफारभाई शेख (वय 42 रा. कोठला) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार वसिमखान पठाण यांनी फिर्याद दिली आहे.

कोठला परिसरातील मस्तान शहा चौक येथे एका ठिकाणी गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने गुरूवारी सायंकाळी 5.50 वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता मतिन शेख हा गोमांस विक्री करत असताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील गोमांस व साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या