Monday, June 24, 2024
Homeनगरयुवकाला आडवून टोळक्याकडून मारहाण

युवकाला आडवून टोळक्याकडून मारहाण

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

दुचाकीवरून जाणार्‍या युवकाला मोपेड दुचाकी आडवी लावून अनोळखी सात ते आठ जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाण करणार्‍या सर्व तरूणांनी तोेंडाला रूमाल बांधलेले होते. गुरूवारी (दि. 2) सकाळी साडे अकराच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर सातळकर हॉस्पिटलच्या पुढे ही घटना घडली. आयान सादीक शेख (वय 23 रा. शनी गल्ली, कामाठीपुरा) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.

त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणार्‍या अनोळखी सात ते आठ तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयान हा गुरूवारी सकाळी 11 वाजता त्याच्या आईला महिला बालकल्याण कार्यालयात कामावर सोडण्यासाठी गेला होता. आईला सोडून तो त्याच्या दुचाकीवरून बालिकाश्रम रस्त्यावरून घरी जात असताना साताळकर हॉस्पिटलच्या पुढे 100 मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला सात ते आठ तरूण उभे होते.

त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते. त्यातील एकाने आयान याच्या दुचाकीला मोपेड दुचाकी आडवी लावली. त्या सर्वांनी काही एक कारण नसताना आयान याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याच्याकडील दुचाकीचीही तोडफोड करून नुकसान केले. घाबरलेला आयान त्याची दुचाकी सोडून आईच्या कार्यालयाकडे पळाला. त्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी अनोळखी तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या