Saturday, January 24, 2026
Homeनगरजिल्हा बँक : 700 जागांसाठी 28 हजार अर्ज दाखल

जिल्हा बँक : 700 जागांसाठी 28 हजार अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा बँकेच्या रिक्त असणार्‍या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेच्या विविध पदाच्या 700 जागांसाठी अर्ज करण्याची मुदत 27 सप्टेंबरला संपली होती. त्यानुसार ऑनलाईन दाखल अर्जातून पात्र उमेदवारांची यादी जिल्हा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती बँक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. दरम्यानच्या 700 जागांसाठी अंदाजे 27 ते 28 हजार अर्ज प्राप्त झाल्याचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या भरतीसाठीच्या पात्र उमेदवारांच्या यादीवरून दिसत आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या जनरल मॅनेजर संगणक 1, मॅनेजर संगणक 1, डेप्युटी मॅनेजर 1, इन्चार्ज प्रथम श्रेणी संगणक 1, क्लेरिकल 687, वाहनचालक सबॉर्डिनेट (ए) 4, सुरक्षा रक्षक सबॉर्डिनेट ‘बी’ 5 अशा 700 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी 13 ते 27 सप्टेंबर दरम्यान बँकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या वर्कवेल कंपनीने पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले होती. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून बँक आणि कंपनीच्यावतीने बँकेच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

YouTube video player

यात जनरल मॅनेजर संगणक 11, मॅनेजर संगणक 17, डेप्युटी मॅनेजर संगणक 18, इनचार्ज प्रथम श्रेणी संगणक 28, क्लेरिकल सुमारे 26 ते 27 हजार, वाहन चालक सबॉडिनेट (ए) सुमारे 800 ते 900, सुरक्षा रक्षक सर्बार्डिनेट ‘बी’ सुमारे 250 ते 300 उमेदवारांचे अर्ज पात्र असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, बँकेच्यावतीने दाखल ऑनलाईन अर्जाची आकडेवारी घेण्यात येत असल्याचे बँक प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

पात्र याद्यांवर नंबरचा अभाव
भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पदनिहाय यादी प्रसिध्द करताना त्यावर क्रमांक नाहीत. यामुळे सर्वाधिक अर्ज आलेल्या क्लेरिकल पदासाठी आलेल्या अर्जाची संख्या काही हजारांमध्ये दिसत आहे. त्यावर क्रमांक नसल्याने या पदासाठी नेमके किती अर्ज आले, याची माहिती मिळू शकली नाही. बँकेकडे विचारणा केली असता याबाबत संबंधित कंपनीकडून माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...