Saturday, September 21, 2024
Homeनगरनगर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला; नाना पटोलेंचा दावा

नगर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला; नाना पटोलेंचा दावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

एकेकाळी नगर जिल्हा (Ahmednagar District) हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. नगर दक्षिणेत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि उत्तरेत भाऊसाहेब वाघचौरे (Bhausaheb Wakchaure) यांच्या विजयाने प्रस्थापित पक्षांना सुरुंग लागला. आता जोमाने कामाला लागा आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्हा काँग्रेस बालेकिल्ला असल्याचे गतवैभव काँग्रेस (Congress) पक्षाला परत मिळवून द्या असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी केले.

राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांचे अभिनंदन आणि सत्कार काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केला. यावेळी संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ उपस्थित होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये नगर जिल्ह्यात दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळवण्यासाठी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले व मित्र पक्षांना सोबत घेऊन आपापल्या उमेदवारांना बळ दिले.

माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि इतर पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (Congress) पक्षाने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे दोन्ही जागा आपण मिळवू शकलो. बाळासाहेब थोरात यांनी राज्यातही आपल्या नेतृत्वाचा प्रभाव टाकत जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या पदरात पाडून घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले याबद्दल पटोले यांनी आनंद व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीतील यश काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीला मोठे बळ आणि आत्मविश्वास देणारे ठरले आहे. यामागे पटोले व बाळासाहेब थोरात यांची रणनीती कामाला आली. आता विधानसभेत तर सत्ता स्थापनेपर्यंतची कामगिरी पटोले आणि थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण करू, असा विश्वास जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी व्यक्त केला. नगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला (Congress) चांगले दिवस आलेले आहेत. महाविकास आघाडीच्या मदतीने जास्तीतजास्त जागा लढवून सर्वच विधानसभेच्या उमेदवारांना आपण निवडून आणू यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी नगर जिल्हा काँग्रेस पदाधिकार्‍यांना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या