Friday, May 17, 2024
Homeनगरअहमदनगरसह 12 जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये

अहमदनगरसह 12 जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये

मुंबई | Mumbai

अहदनगरसह राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यातील 12 जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचं कर्ज दिलं जात आहे.

या कामांना लवकरच सुरुवात होईल. केंद्र सरकारकडूनही निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिले. आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. मागिल पाच वर्षात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिली नाही. परंतु, आता बैठकीत साहसी खेळाचा निर्णय घेतला.

खासगीपेक्षा सरकारी मेडिकल कॉलेजचा नागरिकांना फायदा होईल. महाराष्ट्रात अहमदनगर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलडाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अमरावती, जालना, मुंबई उपनगर आणि वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.

– मंत्री गिरीष महाजन

- Advertisment -

ताज्या बातम्या