अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गणपती बाप्पा नगरकरांचा चांगलेच पावले असून नगर शहर आणि परिसारात यासह जिल्ह्यात अनेक भागात मंगळवारी सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकर्यांसह नगरकरांना मोठा दिलासा मिळाला असून नगर शहरात असणार्या गणेशोत्सवात मोठा व्यत्यय आलेला दिसला. दरम्यान श्रीरामपूर शहर व परिसरातही सरी कोसळत होत्या. सायंकाळी सुरू झालेला हा पाऊस रात्री उशीरापर्यंत कोसळत होता. जिल्ह्याच्या काही भागातही पाऊस सुरू होता.
गुरूवार (दि. 21) च्या रात्रीपासून नगर शहर आणि दक्षिण जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. हा पाऊस नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यात जोरदार बरसला असून यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरीत गेल्या पाच दिवसात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद कर्जत तालुक्यातील राशिन महसूल मंडळात झाली असून याठिकाणी 71 मि.मी. पाऊस झाला आहे.
यासह श्रीगोंदा मंडळात 43 71 मि.मी., पेडगाव मंडळात 47.5 71 मि.मी., कोळगाव 37 71 मि.मी., कर्जत 25.3 71 मि.मी., भांबोरा 44 71 मि.मी., कोंभळी 39.5 71 मि.मी. अशी पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच्या दरम्यान, सुमोर एक तासभर नगर शहरात पुन्हा जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप देत रात्री 9 च्या सुमारास पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती.
नगरला यलो अलर्ट जारी
महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून मान्सून सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. याच्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून शेतीच्या कामाला वेगाल आला आहे. तर हाच पाऊस पुढच्या 3 दिवस कायम असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आगामी 3 दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आजही राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.