Friday, May 17, 2024
Homeनगरतिसर्‍या दिवशीही जिल्ह्यात पाऊस

तिसर्‍या दिवशीही जिल्ह्यात पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सलग तिसर्‍या दिवशी नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. शनिवारी नगर शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून सलग तीन तासांपेक्षा मुसळधार पावसानंतर जवळपास रात्रभर भीज पाऊस सुरू होता. नगर तालुक्यातील 11 महसूल मंडळांत रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असून तालुक्याची एका दिवसाची पावसाची सरासरी 114 टक्के आहे. यासह जिल्ह्यात 55 महसूल मंडळांत दरमदार पाऊस झाला असून 17 मंडळांत अतिवृृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे तीन दिवसांपूर्वी जिल्ह्याची पावसाची सरासरी 52 टक्क्यांवरून थेट 75 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. दमदार पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना पोषक वातावरण तयार झाले असून जिल्हा प्रशासनावरील पाणी आणि जनावरांच्या चार्‍यांचा ताण हलका झाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली आहे. यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने खरीप हंगामातील तूर, मका, चारा पिके, तर उशीराच्या सोयाबीन, कपाशी पिकाला जीवदान ठरला आहे. यासह रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतकर्‍यांसह नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पावसाच्या दमदार हजेरीमुळे दक्षिण जिल्ह्यातील शेतीसाठी वरदार असणार्‍या विविध धरणांच्या पाणी पातळीत वाढ होतांना दिसत आहे. शनिवार दिवस नगर तालुका आणि शहरासाठी वरदान ठरला आहे. दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान सुरू झालेला पाऊस रात्री आठनंतर बरसत होता. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले नव्हे, शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाटच वाहत असल्याचा भास नगरकरांना होत होता. या पावसामुळे गटारीचे स्वरूप बनलेली सीना नदी वाहती झाली असून शहर आणि नदी पात्र एका प्रकार धुवून निघाले आहे.

झालेला पाऊस हा पेरणी लायक असून येत्या आठ दहा दिवसात पेरण्यांना सुरूवात करता येणे शक्य असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार नगर जिल्ह्यात नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, केडगाव, नागापूर, जेऊर, चिचोंडी पाटील, वाळकी, चास, रूईछत्तीसी (नगर), शेवगाव तालुक्यातील शेवगाव, पारनेर तालुक्यातील सुपा, भाळवणी, पळशी, श्रीगोंंदा तालुक्यातील काष्टी, जामखेड तालुक्यातील जामखेड या 17 महसूल मंडळांत 65 मि. मी. ते 166 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यासह नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, केडगाव, नागापूर, जेऊर, चिचोंडी पाटील, वाळकी, चास, रूईछत्तीसी (नगर). पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझीरे, निघोज, टाकळी, पळशी (पारनेर). श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी, पेडगाव, देवदैठण, कोळगाव (श्रीगोंदा). जामखेड, खर्डा, नान्नज, नायगाव, अरणगाव (जामखेड). शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, ढोरजळगाव, एरंडगाव (शेवगाव). पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, मिरी (पाथर्डी). टाकळीमियाँ, वांबोरी (राहुरी). संगमनेर, धांदरफळ, घारगाव, डोळसणे, साकूर (संगमनेर). अकोले, वीरगाव, समशेरपूर (अकोले) याठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली आहे.

नगर 90, पारनेर 91.5, श्रीगोंदा 83.9, कर्जत 67.3, जामखेड 75.5, शेवगाव 86, पाथर्डी 87.3, नेवासा 78, राहुरी 50, संगमनेर 65.7, अकोला 89.9, कोपरगाव 64.4, श्रीरामपूर 41.5 राहाता 58.5 आणि एकूण 75.3 मि.मी., अशी आहे.

नगर तालुक्यातील पाऊस

नालेगाव 166, सावेडी 117, कापूरवाडी 117, केडगाव 128, भिंगार 96, नागापूर 68, जेऊर 102, चिचोंडी पाटील 89, वाळकी 96, चास 162, रुईछत्तीसी 119 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या