Saturday, May 18, 2024
Homeनगरअहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीच्या नामांतराचा ठराव

अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीच्या नामांतराचा ठराव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सोसायटी करण्यात यावे, असा एकमुखी ठराव राहुरी येथे झालेल्या शिक्षकेतर सेवक संघाच्या सभेमध्ये घेण्यात आला. 49 व्या राज्यस्तरीय शिक्षकेतर सेवकांच्या अधिवेशनात देखील हा विषय मांडला जाणार असल्याचे तसेच हे नामकरण न झाल्यास शिक्षकेतर कर्मचारी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा देखील ठराव संमत झाला असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

रविवार दि. 2 जानेवारी रोजी राहुरी येथील प्रगती विद्यालया मध्ये राहुरी तालुका शिक्षकेतर सेवक संघाची सभा पार पडली. अध्यक्षस्थानी वरिष्ठ लिपिक माणिक मेहेत्रेे होते. याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती लोखंडे, रवींद्र आढाव यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संगमनेर येथे होत असलेल्या 49 व्या राज्यस्तरीय शिक्षकेतर सेवक यांच्या अधिवेशनाबाबत चर्चा होऊन सर्व सभासदांनी अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकी प्रमाणे कारवाई करण्याचे ठरले. तसेच सेवकांचे 10,20,30, पदोन्नती बाबत चर्चा होऊन शिपाई भरती बाबत व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सोसायटी असे नामकरण करण्याबाबत ठराव संमत करण्यात आला. असे न झाल्यास आगामी शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीवर शिक्षकेतर कर्मचारी बहिष्कार टाकणार असल्याचे ही सर्वानुमते ठरले. तसेच सोसायटीच्या नामकरणाचा ठराव संगमनेर येथे होणार्‍या राज्यस्तरीय अधिवेशनात मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

सभेस शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत आघाव, सचिव रवींद्र फुगारे, उपाध्यक्ष रंगनाथ जाधव, सतीश सप्रे, भाऊसाहेब जाधव, सतीश तेलोरे, एन. वाय. तेलोरे, भाऊसाहेब गांधले, संतोष गाडेकर, सुनील कांबळे, विजय नरोडे, गणेश विघे, अशोक तनपुरे, विजय लांबे, गणेश इंगळे, अनिल खर्डे, हौशीनाथ बोरडे, विजय धनवडे, सतीश तनपुरे, प्रतिभा कोळपकर, प्रमिला गोपाळे, श्रीमती चोथे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या