Saturday, September 21, 2024
Homeनगरजिल्ह्यात दहावीचे १७९ तर बारावीसाठी १०७ परीक्षा केंद्रे

जिल्ह्यात दहावीचे १७९ तर बारावीसाठी १०७ परीक्षा केंद्रे

अहमदनगर | प्रतिनिधी

- Advertisement -

पुढील महिन्यांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. अद्याप या दोन्ही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यात परीक्षा केंद्र निश्‍चित करणे आणि अन्य तयारीचा समावेश आहे. जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी 179 केंद्र आणि बारावीसाठी 107 केंद्राचा समावेश आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर माध्यमिक परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी तयारी करत असते. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून या समितीत शिक्षणाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश असतो.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

परीक्षेसाठी भरारी पथके, उपद्रवी केंद्र यांची यादी तयार करण्यात येते. त्यानूसार परीक्षेचे नियोजन करण्यात येते. परीक्षेच्या तयारीचा पहिला भाग म्हणजे परीक्षा केंद्र निश्‍चित करणे असून ते काम पूर्ण झाले आहेत.

जिल्ह्यात दहावीचे 179 परीक्षा केंद्र असून यात अकोले 15, संगमनेर 17, कर्जत 12, कोपरगाव 10, जामखेड 5, नगर ग्रामीण 12, नगर शहर 17, नेवासा 14, पाथर्डी 13, पारनेर 13, राहाता 11, राहुरी 8, शेवगाव 9, श्रीगोंदा 13 आणि श्रीरामपूर 10 यांचा समावेश आहे.

MPSC कडून बंपर भरती! तब्बल ८,१६९ पदासाठी निघाली जाहिरात

तर बारावीसाठी अकोले 6, संगमनेर 9, कर्जत 7, कोपरगाव 5, जामखेड 6, नगर ग्रामीण 4, नगर शहर 13, नेवासा 5, पाथर्डी 12, पारनेर 7, राहाता 6, राहुरी 5, शेवगाव 11, श्रीगोंदा 6 आणि श्रीरामपूर 5 यांचा समावेश आहे.

विद्यार्थी संख्या परीक्षा बोर्ड कळविणार

दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शाळा, ज्युनिअर कॉलेजकडून परीक्षा बोर्डाकडे नोंदणी करण्यात येते. नोंदणी प्रक्रिया झाल्यावर परीक्षेच्या आधी परीक्षा बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची संख्या कळविण्यात येते.

राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

- Advertisment -

ताज्या बातम्या