अहमदनगर (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली असून मतदान यादीत नाव असून देखील त्यापुढे डिलेटेड असा शिक्का असल्याने नागरिकांना मतदान करता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने मतदार मतदानाला मुकले. त्यांनी नाराजी व्यक्त करत केंद्रावरून माघारी परतले. नगर शहरातील पाऊलबुध्दे काॅलेजच्या केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर येत असून बीएलओकडे मतदार यादीची तपासणी केल्यानंतर काही नागरिकांच्या नावापुढे डिलेटेड नाव असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात निवडूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी मतदारांनी संपर्क केला असता त्यांनी याबाबत आम्हाला काही सांगता येणार नसल्याने सांगून हात झटकले. मतदानाचा हक्क बजावता येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.