Saturday, October 5, 2024
Homeनगरमनपा आयुक्त डॉ. जावळेंनी मागितली आठ लाखाची लाच

मनपा आयुक्त डॉ. जावळेंनी मागितली आठ लाखाची लाच

लाचलुचपत विभागाची कारवाई || स्विय सहायकही जाळ्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना (Anti-Bribery Department Jalana) येथील पथकाने अहमदनगर महापालिकेत (Ahmednagar Municipal Corporation) मोठी कारवाई केली. बांधकाम परवानगी देण्यासाठी व्यावसायिकाकडे आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे (Commissioner Administrator Dr. Pankaj Jawale) यांचे स्विय सहायक श्रीधर देशपांडे यांनी आठ लाख रूपयांची मागणी केली. डॉ. जावळे यांनी लाच मागणी करण्यासाठी देशपांडे यांना प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आयुक्त डॉ. जावळे यांच्यासह त्यांच्या स्विय सहायकाविरूध्द लाचेची (Bribe) कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. जावळे यांचे दालन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (गुरूवारी) दुपारी दोनच्या सुमारास सील केले. त्यांच्या शासकीय निवासस्थानाला देखील टाळे लागले आहे.

- Advertisement -

तक्रारदार हे बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील नालेगाव (Nalegav) येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर त्यांना भागीदारांसह बांधकाम करायचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालयाकडे 18 मार्च 2024 रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. सदर परवानगीसाठी आयुक्त डॉ. जावळे हे स्विय सहायक देशपांडे याच्या मार्फत नऊ लाख 30 हजार रूपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी जालना (Jalana) येथील लाचलुचपत विभगाकडे केली होती.

या तक्रारीवरून लाचलुचपत विभगाने 19 व 20 जून 2024 रोजी पडताळणी केली असता देशपांडे याने तक्रारदार यांच्याकडे आयुक्त डॉ. जावळे (Commissioner Administrator Dr. Pankaj Jawale) यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी आठ लाख रूपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आयुक्त डॉ. जावळे हे देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आयुक्त, स्विय सहायक पसार
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच पडताळणी सापळा यशस्वी करण्यात आला व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आयुक्त डॉ. जावळे व त्यांचा स्विय सहायकाला ताब्यात घेण्यात आले नव्हते. त्यांच्या शोधासाठी नगरसह जालना लाचलुचपतची तीन पथके रवाना करण्यात आली आहे. डॉ. जावळे यांचे दालन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास सील केले. त्यांच्या शासकीय निवासस्थानाला देखील टाळे लागले आहे.

देशपांडेंची उच्चभ्रू वस्तीत मालमत्ता
स्विय सहायक श्रीधर देशपांडे याच्या घराची झडती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी घेतली. घरझडतीमध्ये 93 हजाराची रोख रक्कम, सुमारे साडेआठ तोळ्याचे सोन्याचे दागिने, एकुण नऊ मालमत्ता संदर्भात कागदपत्रे मिळून आली आहेत. सदर मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्या उपनगरामध्ये खरेदी केल्याची ही कागदपत्रे आहेत. तसेच बीड जिल्ह्यात देखील शेत जमीन खरेदी केल्याची माहिती हाती आली असल्याचे उपअधीक्षक लोखंडे यांनी सांगिलते.

दिवसभर कारवाईची चर्चा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर महापालिकेत मोठी कारवाई केल्याची चर्चा गुरूवारी सकाळपासून होती. नगर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथील पथक असल्याचे बोलले जात होते. स्वत: आयुक्त लाचेच्या जाळ्यात अडकले असल्याची चर्चा सर्वत्र पसरली, परंतू याबाबत अधिकृत माहिती दुपारपर्यंत कोणालाही मिळत नव्हती. मनपाच्या बहुतांश अधिकार्‍यांचे मोबाईल गुरूवारी स्वीचऑफ होते. त्यामुळे नेमके काय झाले, याची उत्सुकता शहरभर होती. शेवटी दुपारी जालना येथील पथकाकडून कारवाईसंदर्भात माहिती देण्यात आली आणि त्यात आयुक्त आणि त्यांच्या स्विय सहायकाने लाच मागितल्याचे समोर आले.

फटाके फोडून जल्लोष
आयुक्तच लाचेच्या कारवाईत अडकल्याने याची चर्चा शहरभर झाली. एकमेकांना फोनाफोनी करून अनेकांनी कारवाईचे स्वागत केले. नगर शहरातील भाजपाच्या काही पदाधिकार्‍याने महापालिकेसमोर फटाके फोडून आयुक्त व त्यांच्या स्विय सहायकावर झालेल्या कारवाईचे स्वागत करून जल्लोष केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या