Thursday, November 14, 2024
Homeनगर40 ई-बसेसची नगरकरांना प्रतिक्षा

40 ई-बसेसची नगरकरांना प्रतिक्षा

वीज उपलब्ध न झाल्याने चार्जिंग स्टेशनचे काम रखडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत देशातील 169 शहरांचा समावेश करण्यात आला असून नगर शहरासाठी 40 ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिका चार्जिंग स्टेशन उभारत आहे. मात्र महावितरणकडून अद्याप चार्जिंग स्टेशनच्या प्रस्तावित जागेपर्यंत वीज उपलब्ध न झाल्याने हे काम रखडले आहे. परिणामी, ई-बस साठी नगरकरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- Advertisement -

पीएम ई-बस सेवा योजनेसाठी केंद्र सरकारने 16 ऑगस्ट रोजी 20 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 169 शहरांना तब्बल 10 हजार ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 20 ते 40 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 150, 10 ते 20 लाख व 5 ते 10 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 100 व 5 लाखांच्या आतील लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 50 पर्यंत ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नगर शहराला गरजेनुसार 40 बसेस उपलब्ध होणार आहेत. तसा प्रस्तावही मंजूर झालेला आहे.

मात्र त्यासाठी महापालिकेला चार्जिंग स्टेशन उभारावे लागणार आहे. चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने केडगाव येथील जागा निश्चित केली आहे. तेथे वीज भार मंजूर झालेला आहे. मात्र सोनेवाडी सब स्टेशन पासून महापालिकेच्या सबस्टेशनपर्यंत अद्याप विजेचा पुरवठा करणारी वाहिनी टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे या चार्जिंग स्टेशनची उभारणी रखडली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या