Friday, September 20, 2024
HomeनगरAhmednagar Politics : जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर

Ahmednagar Politics : जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर

अहमदनगर | प्रतिनिधी

- Advertisement -

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक घटना, घडमोडी घडल्या. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी सुरूवातीला चौघांनी उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले.

मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे नीलेश लंके शरद पवार गटात परतले आणि लोकसभा निवडणूक लढवत यशस्वी झाले. यामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाकडे शिल्लक असणाऱ्या तीन आमदारांपैकी एक आमदार पुन्हा शरद पवार गटात परतण्याच्या तयारीत असून येत्या काही दिवसांत हा प्रवेश होणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असून प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हालचाली वाढल्या असून गुरूवारी स्वतः शरद पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी नगरसह राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप आणि अन्य बाबींचा आढावा घेतला. यावेळी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे निवड पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नगर जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडमोडीची माहिती पवार आणि प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांना सादर केली.

हे ही वाचा : ‘जरांगेंना बिग बॉस मध्ये घ्या’…; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला

नगर जिल्ह्यातील येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीने माहिती देतांना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कोणाचा प्रभाव आणि त्याठिकाणी जागा वाटपात शरद पवार गटाला कोणत्या जागा मिळाव्यात. मित्र पक्षाची मतदारसंघनिहाय ताकद, त्याठिकाणी काँग्रेस अथवा शिवसेना उध्दव ठाकरे गटाची परिस्थिती याबाबत माहिती दिली. नगर जिल्ह्यातून अकोले, नगर शहर आणि कोपरगावचे आमदार हे अजित पवार गटासोबत असून त्यातील एक आमदार शरद पवार गटाकडे येण्यास इच्छुक आहे.

प्राथमिक चर्चेत संबंधीत आमदाराने शरद पवार गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लवकर याबाबत अंतिम चर्चा होवून अजित पवार गटाचा आमदार शरद पवार गटात दाखल होणार आहे. यामुळे अकोले, नगर शहर आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघापैकी कोण पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत नगर जिल्ह्यात अनेक राजकीय घडमोडी घडणार असून जिल्ह्यात पुन्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी नंबर एक होणार असल्याचा विश्वास यावेळी पवार आणि प्रदेशाध्य आ. पाटील यांना देण्यात आला.

हे ही वाचा : गोळीबाराने कोपरगाव हादरले! भरदिवसा झाडल्या गोळ्या, एक गंभीर जखमी

नगर शहर मतदारसंघात नाट्यपूर्ण घडामोड

नगर शहरात गेल्या दोन टर्मपासून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आ. जगताप हे सुरूवातीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यांनी अजितदादा यांच्या मार्फत नगर शहरात मोठा निधीही आणला. मात्र, अनेक विषयांमुळे आ. जगताप यांच्या अडचणी वाढत असून नगर शहराच्या राजकारणात नवीन एन्ट्री होणार आहे. ही एन्ट्री आ. जगताप यांच्यासाठी तापदायक ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव विर्सजन मिरवणुकीत त्याची झलक नगरकरांनी पाहिली असून नगरचे भावी आमदार म्हणून आताच संबोधण्यात येत आहे. या एन्ट्रीसाठी जिल्ह्यातील उत्तरेतील एका बड्या नेत्याने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हे ही वाचा : “पुढचा मुख्यमंत्री…”; थोरातांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत नाराजी?

- Advertisment -

ताज्या बातम्या