Friday, May 24, 2024
Homeनगरशिक्षक दिनापूर्वी वेतन अदा करा

शिक्षक दिनापूर्वी वेतन अदा करा

अहमदनगर | प्रतिनिधी

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे (Teachers and non-teaching staff) ऑगस्ट (August) महिन्याचे वेतन शिक्षक दिनापूर्वी (Teacher’s Day) अदा करुन शिक्षक दिन (Teacher’s Day 2021) व गणेशोत्सव (Ganeshotsav) गोड करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या (Maharashtra State Teachers Council) वतीने शिक्षण विभागाकडे (Department of Education) करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी शिक्षण आयुक्तांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

- Advertisement -

अनेक महिन्यांपासून राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन वेळेवर होत नाही. राज्यातील काही विभागातील शाळा यांचे वेतन तर दोन-दोन महिने उशिरा होत आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे. तसेच 10 सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. मंत्रालयातून योग्य वेळेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पाठपुरावा करून वेतन निधी मंजूर करून घेतला आहे. त्याचे तातडीने वितरण मुंबईसह राज्यातील सर्व विभागात झाल्यास शिक्षक, शिक्षकेतर यांचे वेतन शिक्षक दिनापुर्वी होऊ शकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शिक्षक, शिक्षकेतरांचा शिक्षक दिन व गणेशोत्सव गोड होण्यासाठी पाच सप्टेंबर पूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांचे वेतन होण्यासाठी संबंधितांना आपल्या स्तरावर आदेश निर्गमित करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. शिक्षक, शिक्षकेतरांना वेळेत वेतन मिळण्यासाठी शिक्षक परिषद प्रयत्नशील असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या