Saturday, May 17, 2025
Homeनगरअ‍ॅडमिशनसाठी चाललेल्या बाप-लेकीचा अपघात; वडिलांचा मृत्यू, मुलगी जखमी

अ‍ॅडमिशनसाठी चाललेल्या बाप-लेकीचा अपघात; वडिलांचा मृत्यू, मुलगी जखमी

अहमदनगर । प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर (पांढरीपूल) घाटात मंगळवारी कंटेनर रस्त्यावर उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे. अनिल दगडू फाटके (वय 43 रा. खरवंडी ता. नेवासा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुलगी दीपाली अनिल फाटके (वय 20) जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, डांबर भरलेले पिंप असलेला कंटेनर घाटात रस्त्यावरच आडवा झालेला असल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. एमआयडीसी पोलिसांनी ती सुरळीत केली. डांबराने भरलेली पिंप घेऊन कंटेनर छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. इमामपूर घाटात उताराला कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व तो माल वाहतूक करणार्‍या वाहनाला धडकला. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले तर कंटेनरही रस्त्यातच उलटून आडवा झाला. त्याचवेळी नेवासा तालुक्यातील खरवंडी येथून मुलीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी नगरकडे दुचाकीवर येत असलेले फाटके यांच्या दुचाकीला कंटेनरची धडक बसली. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन मयत झाले.

तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. या अपघाताची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक अपघातस्थळी पोहोचले.तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करून अपघातग्रस्तांना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान अनिल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातादरम्यान इमामपूर घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली होती. कंटेनर रस्त्यावरच आडवा झालेला असल्याने आणि त्यात डांबराने भरलेले पिंप असल्याने ते रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम बराच वेळ सुरू होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. फाटके यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आम

Aam Admi Party: दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका; वरिष्ठ नेत्यांकडून...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi दिल्लीतील सत्ता गमावणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात फूट मोठी पडली आहे. दिल्ली महापालिकेत पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी...