Friday, September 20, 2024
Homeनगरदहावीतही नगरच्या पोरीच ठरल्या हुश्शार !

दहावीतही नगरच्या पोरीच ठरल्या हुश्शार !

नगरचा निकाल 95 टक्के

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल काल, सोमवारी जाहीर केला आहे. पुणे विभागात नगर तिसर्‍या स्थानी राहिले. जिल्ह्याचा एकूण निकाल 94.56 टक्के लागला. बारावीप्रमाणेच जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.61 टक्के, तर मुलांचे प्रमाण 92.91 टक्के राहिले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर केला. पुणे विभागात पुणे जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले. दुसर्‍या क्रमांकावर सोलापूरने बाजी मारली तर नगर तिसर्‍या स्थानी राहिले.

नगर जिल्ह्यात दहावीसाठी 69 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 69 हजार 265 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 65 हजार 502 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीत 24 हजार 515, प्रथम श्रेणीत 23 हजार 818, द्वितीय श्रेणीत 13 हजार 427, सामान्य श्रेणीत 3 हजार 742 विद्याथ़्र्यांचा समावेश आहे. विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील 342 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत कॉपी पासून परावृत्त होण्याचा कल वाढलेला आहे. पालक आणि शिक्षक यांची कॉपीमुक्त अभियानाला साथ मिळत असल्यानेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी पोषक वातावरण तयार होत आहे, हे यश निश्चितच दिलासा देणारे आहे.

अशोक कडूस, शिक्षणाधिकारी

तालुकानिहाय निकाल
अकोले – 95.67, जामखेड – 95.96, कर्जत – 95.74, कोपरगाव – 93.17, नगर – 94.68, नेवासा – 95.18, पारनेर – 95.89, पाथर्डी – 95.09, राहाता – 93.30, राहुरी – 92.21, संगमनेर – 94.93, शेवगाव – 95.45, श्रीगोंदा – 96.23, श्रीरामपूर – 91.44.

- Advertisment -

ताज्या बातम्या