Friday, May 3, 2024
Homeनगरतनपुरेंनंतर अगला कौन?

तनपुरेंनंतर अगला कौन?

अहमदनगर | Ahmednagar

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्याशी संबंधित कंपनीशी संबंधित नागपूर (Nagpur) येथील कारखान्याची एकूण १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याने नगरच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. ईडी (ED) नगरच्या (Ahmednagar) दारापर्यंत पोहचल्याने जिल्ह्यात कोणा कोणाचा नंबर लागणार यावरून चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

अंमलबजावणी संचालनालयाकडून (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीकडून डिसेंबर महिन्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (Maharashtra State Co-operative Bank) साखर कारखान्यांच्या घोटाळ्याप्रकरणी (sugar factory scam) चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल नऊ तास चौकशी झाली होती. त्यानंतर काल ईडीकडून प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित नागपूरमधील (Nagpur) राम गणेश गडकरी साखर कारखान्याची (Ram Ganesh Gadkari of Sugar Factory) मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर नगरच्या राजकारणातही खळबळ उडाली.

…असा पार पडला लग्नसोहळा शिबानी-फरहानचा लग्नसोहळा; पाहा खास फोटो

नागपूरमध्ये प्राजक्त तनपुरे यांचा राम गणेश गडकरी साखर कारखाना आहे. त्याचा लिलाव झाल्यापासून हा कारखाना वादाच्या भोवऱ्यात होता. ईडीच्या दिल्ली (Delhi) आणि मुंबईतील (Mumbai) पथकांनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस युनिटेक ग्रुप आणि राज्य सहकारी बँकेशी यासंदर्भात मुंबईसह पुणे, नागपूर आणि अहमदनगरमधील नऊ ठिकाणी तपासणी केली होती. राम गणेश गडकरी साखर कारखाना बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये ना. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड ॲग्रो प्रॉडक्ट्सला (Prasad Sugar and Allied Agro Products) विकला गेल्याचा आरोप आहे.

काल नागपूरात ईडीकडून राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कारवाईत अहमदनगरमधील ४ एकर जमीन जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सहकारातील आणखी काही नेत्यांमागे ईडीची पिडा लागणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. ईडी नियमाप्रमाणे काम करत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत असताना सरकार पाडण्यासाठी नेत्यांवर दबावासाठीच भाजपाडून (BJP) केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) सुरू आहे.

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

- Advertisment -

ताज्या बातम्या