Friday, May 3, 2024
Homeनाशिकआयमा’च्या अँटिजेन तपासणी शिबिरात 52 जण पॉझिटिव्ह

आयमा’च्या अँटिजेन तपासणी शिबिरात 52 जण पॉझिटिव्ह

सातपूर । Satpur (प्रतिनिधी)

आयमा व महापालिकेतर्फे मोफत करोना रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिराचे अंबड औद्योगिक वसाहतीत आयोजन करण्यात आले असून, आठ दिवस ही तपासणी सुरू राहणार आहे.

- Advertisement -

यामध्ये आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 225 उद्योजक व कामगारांत 52 जण पॉझिटीव्ह असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

आयमा, महापालिका, रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्स अंबड, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनीतर्फे मोफत करोना रॅपिड अँंटिजेन टेस्ट शिबिराचे आयोजन आयमा रिक्रिएशन सेंटर जवळील आयटी पार्क येथील इमारतीत करण्यात आले आहे.

आयमच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्ताने अंबड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, कामगार यांच्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत हे मोफत कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिर होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

व्यासपीठावर नाशिक रोटरीचे गुरुमित सिंग रावळ, आयमा अध्यक्ष वरूण तलवार, रोटरी नाईन हिल्सचे विजय जोशी, सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या