Thursday, January 8, 2026
HomeUncategorizedअसदुद्दीन ओवैसींना 'ती' घोषणा भोवणार? संसद सदस्यत्व जाण्याचा धोका

असदुद्दीन ओवैसींना ‘ती’ घोषणा भोवणार? संसद सदस्यत्व जाण्याचा धोका

दिल्ली | Delhi

AIMIM पक्षाचे प्रमुख आणि हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मंगळवारी लोकसभेत खासदारपदाच्या शपथविधीवेळी ओवैसी यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ जय पॅलेस्टाईनचा नारा दिला.

- Advertisement -

त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, यानंतर ओवैसी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी होऊ लागली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे यासंबंधित तक्रार करण्यात आली आहे.

YouTube video player

ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ट्विट केले की, हरि शंकर जैन यांनी भारतीय संविधानाच्या कलम १०२ आणि १०३ अंतर्गत असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ओवैसींच्या घोषणाबाजीनंतर संसदेत गदारोळ झाला. एनडीएच्या खासदारांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर खुर्चीत बसलेल्या राधामोहन सिंह यांनी ते रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश दिले.

ओवैसी हे सलग पाचव्यांदा हैदराबाद येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा पराभव केला. ओवैसी यांना एकूण ६,६१,९८१ एवढी मते मिळाली. त्यांनी माधवी लता यांचा ३,३८०८७ मतांनी पराभव केला. २००४ पासून ते या मतदारसंघातून जिंकून जात आहेत.

ताज्या बातम्या

नगरसेवक

Ambernath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘ते’ १२ नगरसेवक भाजपच्या गोटात

0
मुंबई | Mumbaiअंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने केलेली युती राज्यात चर्चेत ठरली आहे. येथील सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला होता. त्यावरुन, सुरू...