मुंबई | Mumbai
असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाला महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. राज्यात तीन आकडी संख्या गाठतानाच मुंबईतही एमआयएमने कमालीची कामगिरी केली आहे. मनसेला जे मुंबईसह राज्यात शक्य झाले नाही ते एमआयएमने करून दाखवले आहे. महाराष्ट्रातील मतदारांचे अभिनंदन आणि कौतुक करतानाच पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कानपिचक्या आणि मोलाचा सल्लाही दिला आहे. त्याचवेळी त्यांच्यावर होणाऱ्या एका मोठ्या आरोपाचे उत्तरही त्यांनी दिले आहे.
ओवैसी नेमकं काय म्हणाले?
एक चांगाल निकाल आला आहे. मला आशा आहे की आमचे जे नगरसेवक जिंकूण आले आहेत, ते जनतेच्या आशांवर खरे उतरतील. मी यापूर्व म्हणालो होतो, विजयी होणे आवघड वाटते. मात्र जिंकल्यानंतर आपल्याला लोकांच्या आशांवर खरे उतरावे लागते. त्यांच्यासाठी काम करावे लागते. आपण निवडणुकीदरम्यान जी आश्वासने दिली आहेत, त्यावर कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे. मी आमच्या सर्व नगरसेवकांना सांगत आहे की, लोकांमध्ये राहा, ज्या प्रभागांतून आपण विजयी झाला आहात, तेथे विकासाची कामे करून घ्या,” असे एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
Maharashtra Cabinet Meeting: महापालिका निवडणुका आटोपताच मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय
प्रत्येकाला नगरसेवक होण्याची इच्छा होती
तब्बल सात ते १० वर्षांनी महापालिका निवडणुका झाल्याने प्रत्येकाला नगरसेवक होण्याची इच्छा होती. या निवडणुकीच्या निमित्ताने ही इच्छा काहींना पूर्ण करण्यात यश मिळाले. मात्र, आता बोलण्याला लगाम लावा आणि देहबोली (बॉडी लॅग्वेज) चांगली राहील, याकडे लक्ष द्या, असा मोलाचा सल्ला ओवैसी यांनी दिला आहे. तसेच तुमच्या प्रभागांमध्ये विकासाची कामे करा कारण भविष्यात हीच कामे मतांच्या रुपाने तुम्हाला मिळणार आहेत, असे ओवैसी यांनी स्पष्ट केले. तसेच कुठलाही महत्त्वाचा धोरणात्मक, तसेच समित्यांबाबत निर्णय एकाएकी घेऊ नका! त्याबाबत पक्षाशी चर्चा करा, असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले आहे.
गिरे तो भी टांग उप्पर!
दरम्यान, भाजपवरून आपल्यावर अनेक प्रकारचे आरोप होत असतात, आता ते आरोपांवरून प्रश्न निर्माण झाला आहे की, मॅच फिक्स होती भाजपसोबत? असे विचारले असता, “जे आरोप लावतात, हैदराबादमद्ये एक म्हण आहे, गिरे तोभी टांग उपर! आता माझ्याकडे त्याचा काही इलाज नाही. आपण आरोप करा मला काही फरक पडत नाही. मात्र, त्यांना एक गोष्ट समजायल हवी की आपण, हे जे काही बोलत आहात, ज्यांनी आम्हाला निवडून दिले आहे, त्यांना आणखी दुखावाल तर, आपले आणखी नुकसान होईल,” असे ओवेसी म्हणाले.




