नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. थायलंडमधील फुकेट येथून नवी दिल्लीकडे येणाऱ्या AI-379 या विमानाला शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानातील १५६ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानाने अंदमान समुद्रावर चक्कर मारल्यानंतर फुकेट विमानतळावर परत लँडिंग केले. धमकी देणाऱ्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ही घटना अहमदाबाद दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी घडली आहे.
एअर इंडियाचे विमान एआय ३७९ हे फुकेटहून नवी दिल्लीला निघाले होते. त्यात १५६ प्रवासी होते. परंतु, उड्डाणानंतर बॉम्बची धमकी देण्यात आली. त्यानंतर, विमान अंदमान समुद्राभोवती घिरट्या घालून परत आले. तसेच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. एओटीने अद्याप बॉम्बच्या धमकीची पुष्टी केलेली नाही.
लँडिंगनंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षिततेसाठी खाली उतरवण्यात आले. त्याचबरोबर संपूर्ण विमानाची बारकाईने तपासणी केली जात आहे. विमानाने शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता (0230) फुकेट विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केले होते. परंतु अंदमान समुद्राजवळ धमकी मिळाल्याने ते परत लँड करवण्यात आले. सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे सांगितले.
लँडिंगनंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षिततेसाठी खाली उतरवण्यात आले. त्याचबरोबर संपूर्ण विमानाची बारकाईने तपासणी केली जात आहे. विमानाने शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता (0230) फुकेत विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




