Friday, May 3, 2024
Homeनाशिकमनपाच्या वतीने मोरवाडी व गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट

मनपाच्या वतीने मोरवाडी व गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट

नाशिक | Nashik

महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी व गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांनी जागेची पाहणी करून या ठिकाणी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिले आहेत.

- Advertisement -

नाशिक शहर व परिसरात काही दिवसां पासून ऑक्सिजनचा होणारा अपुरा पुरवठा यावर नियोजन करण्याच्या दृष्टीने मनपाच्या वतीने मोरवाडी व गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या अनुषंगाने

मोरवाडी येथील यूपीएससीच्या बाजूच्या मोकळ्या मैदानाचे व प्रबोधनकार ठाकरे सभागृह येथील बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली. तसेच गंगापूर यूपीएससी बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करून या दोन्ही ठिकाणी एअर ऑक्सीजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

या एअर ऑक्सीजन प्लांटच्या माध्यमातून जम्बो ऑक्सीजन सिलेंडर भरून देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन महापालिकेचे असून त्यामुळे शहरात जाणवणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करणे शक्य करणे होणार आहे.

या पाहणीच्या वेळी मोरवाडी दवाखान्याची पाहणी करून तेथील कामकाजाची व औषध साठ्याची माहिती यावेळी मनपा आयुक्तांनी घेतली. तसेच गंगापूर येथील दवाखान्याची पाहणी करून तेथील औषध साठा व रुग्णांना मनपाच्या वतीने दिली जात असणाऱ्या सेवेची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी घेतली.

यावेळी त्यांच्या समवेत मा.अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मा.मयुर पाटील,मा.नितीन नेर, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश कोशिरे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या