नाशिक | प्रतिनिधी Nashik
विमानतळ बंद करण्याबाबत विमान वाहतूक अधिकार्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, इंडीगो विमान कंपनीने १० मे रोजी सकाळी ५:२९ वाजेपर्यंत श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाळा, बिकानेर, जोधपूर, ग्वाल्हेर, किशनगड आणि राजकोट येथे जाणारी व येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
विमान कंपनी तेथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.त्यानंतरच उदभवणार्या परिस्तितीनुसार इतर क्षेत्रांमध्ये वेळापत्रकात बदल केले जाऊ शकतात. इंडीगो विमान कंपनी आपल्या ग्राहकांना घडामोडींबद्दल माहिती देत राहीलच. विमानतळावर जाण्यापूर्वी ग्राहकांनी आपल्या विमानाची स्थिती तपासण्याचा प्रामाणिक सल्ला इंडीगो कंपनीने दिला आहे.
देशासाठी व देशवासीयांसाठी हा संवेदनशील काळ आहे आणि नेहमीप्रमाणे, आपल्या ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी इंडीगो कंपनी कटीबध्द आहे. नागरीकांच्या सततच्या संयमाबद्दल आणि सहकार्याबद्दल विमान कंपनी ऋणी राहणार असल्याचेही प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.