Thursday, March 27, 2025
Homeमनोरंजनऐश्वर्या, आराध्या यांचा अहवाल निगेटिव्ह

ऐश्वर्या, आराध्या यांचा अहवाल निगेटिव्ह

मुंबई । Mumbai

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती अभिषेक बच्चन याने ट्विटरद्वारे दिली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या व आराध्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. दरम्यान अमिताभ बच्चन व अभिषेक यांच्यावर नानावटीमध्ये अजूनही उपचार सुरू आहेत. या दोघांना पुढील काही दिवस वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.

अभिषेक बच्चनने ट्विटरवर याबाबत सांगितले कि, ‘तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. ते आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत’, असे म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शहीद जवानाच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना मंत्री गिरीश महाजन जखमी

0
वरणगाव, ता.भुसावळ Bhusawalवरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन आज वरणगाव शहरात दाखल झाले व शहिद जवान...