Sunday, October 6, 2024
Homeदेश विदेशअजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तिसऱ्यांदा नियुक्ती

अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तिसऱ्यांदा नियुक्ती

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची पुन्हा एकदा NSA म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनाही सेवेत मुदतवाढ मिळाली आहे. याबाबत आज निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या दोन्ही पदांवरील सेवा विस्तारास मान्यता दिली आहे. आता अजित डोवाल पुढील ५ वर्षे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदावर राहणार आहेत.

अजित डोवाल यांना कॅबिनेटपदाच्या अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच इटली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत अजित डोवाल हे देखील जाणार आहेत. मोदींसोबत ते ते G-7 शिखर परिषदेत सहभागी होतील.

- Advertisement -

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजित डोवाल यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यांची १० जून २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पुढील आदेशापर्यंत किंवा पंतप्रधानपदापर्यंत कायम राहील. मोदी सरकारच्या काळात अजित डोवाल यांचा कार्यकाळ महत्त्वाचा ठरला आहे. अजित डोवाल हे आयपीएस अधिकारी आहेत आणि त्यांनी गुप्तचर अधिकारी म्हणून बरेच ठिकाणी काम केले आहे.

२०१४ मध्ये त्यांनी पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम सुरु केले होते. भारताच्या अरब देशांसोबतच्या चांगल्या संबंधांसाठी डोभाल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जातं. मोदी सरकारच्या काळात भारताने पाकिस्तानबाबत कडक धोरण अवलंबले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या