Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik News : स्वप्नातही वाटले नव्हते, अजित दादांच्या अस्थी घेऊन येथे यावे...

Nashik News : स्वप्नातही वाटले नव्हते, अजित दादांच्या अस्थी घेऊन येथे यावे लागेल!

रामकुंड येथे मंत्री भुजबळांची भावनिक प्रतिक्रिया

पंचवटी |प्रतिनिधी| Panchwati

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Ajit Pawar) यांच्या अस्थी विसर्जनाचा क्षण अत्यंत वेदनादायी असून, “अजित दादांच्या अस्थी घेऊन रामकुंडात यावे लागेल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. स्वप्नातही हा क्षण पाहिला नव्हता. मन दुभंगून टाकणारा हा प्रसंग आहे,” अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी आपल्या भावना भावूक शब्दात व्यक्त केल्या.

- Advertisement -

नाशिकच्या पवित्र रामकुंड (Nashik Ramkund) परिसरात अजित दादा पवार यांच्या अस्थी विसर्जनप्रसंगी सोमवारी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी अजित दादांकडे भाजपाशी संबंधित सिंचन घोटाळ्याची फाईल असल्याचा दावा केला होता. त्यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे तिघेही एकमताने राज्यकारभार चालवत होते. त्यामुळे सरकारमध्ये एकमेकांपासून काही लपवून ठेवले गेले होते, असा प्रश्नच निर्माण होत नाही. कोणतीही गोष्ट किंवा फाईल लपवून ठेवण्याचा प्रकार घडलेला नाही.”

YouTube video player

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर भाष्य करताना भुजबळांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर विश्वास नसल्याचे ठामपणे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर ते म्हणाले की, “प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माहिती सांगत आहे. मात्र या दाव्यांना ठोस पुरावा काय आहे, हे कोणीही स्पष्ट करत नाही.”

भुजबळ पुढे म्हणाले की, ज्या बैठकीचा उल्लेख केला जात आहे, ती बैठक कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानेच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आगामी जिल्हा परिषद निवडणुका स्थानिक पातळीवर एकत्र लढवाव्यात, असा विचार मांडण्यात आला होता. ही माहिती स्वतः अजित दादांनी आम्हाला दिली होती. त्यापलीकडे कोणत्याही प्रकारच्या विलिनीकरणाबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.राजकीय निर्णयांबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, “राज्याच्या मोठ्या पदावर सुमित्रा ताई पवार विराजमान आहेत. या संदर्भातील निर्णय त्या योग्य वेळी घेतील. सध्या आम्ही सर्वजण भाजपप्रणीत सरकारमध्ये असून, सरकारचा घटक म्हणून काम करत आहोत.”

दरम्यान, रामकुंड येथे पार पडलेल्या अस्थी विसर्जनाच्या वेळी परिसरात शोकमय वातावरण होते. उपस्थित नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अश्रूंच्या साक्षीने अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...