Friday, September 20, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…

पुणे । Pune

- Advertisement -

शिवसेनेच्या (shivsena) अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात उलथापालथ होऊन शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर असतांना त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या.

त्यावेळी शिंदे यांनी हिंगोलीतील (hingoli) काही नद्यांना पूर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत तेथील पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधतानाच व्हिडीओ समोर आला होता. यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे…

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री होतो, आम्ही सत्तेत असताना काम करत होतो. काम करत असताना लावरे लगेच फोन अशी माझी शैली होती. मात्र फोन लावत असताना आम्ही आधी कधी कॅमेरा लावला नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज (रविवार) पुणे (Pune) दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय (Obc Reservation) निवडणुका होऊ नयेत अशी आमची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मंगळवारी (ता.१२) ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील इम्पेरिकल डाटा तयार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जसे मध्यप्रदेश सरकारचे इम्पेरिकल डाटा ग्राह्य धरून तिथे ओबीसींना आरक्षण दिले. त्याच प्रकारे महाराष्ट्र सरकारचा डाटा ग्राह्य धरुन महाराष्ट्रातही ओबीसी समाजाला आरक्षण द्याव अशी माफक अपेक्षा असल्याचे पवार यांनी नमूद केले.

तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत (Rebel MLA) भाष्य करतांना ते म्हणाले की, पक्षांतर बंदी कायदा आला तेव्हा त्यामध्ये कशाचा अंतर्भाव केला होता. त्याबाबत विधी तज्ज्ञ आणि प्रख्यात वकील आपापल्या परीने भूमिका मांडतात. या प्रकरणावर उद्याच्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काय निकाल लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. आम्हालाही तसेच वाटतंय किमान दिसताना तरी ते तसेच दिसत असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या